नदीपात्रात तरुणावर हल्ला करून पाय खाणाऱ्या शार्कचं काय झालं? VIDEO
पालघर : नदीपत्रात मासेमारी करताना एका तरुणावर शार्कने हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. शार्क माशाने तरुणाचे लचके तोडल्याची ही धक्कादायक घटना पालघरमधील मनोर परिसरात समोर आली. मनोर जवळील वैतरणा नदी पात्रात महाकाय शार्क मासा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या माशाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, या माशाचं पुढं काय झालं, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
समुद्राला उधाण आल्याने याच उधाणाच्या पाण्यासोबत हा महाकाय मासा या नदीपात्रात आला होता. मात्र, उधाणाचं पाणी कमी झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हा मासा मृतावस्थेत स्थानिकांनी नदीपात्राच्या बाहेर काढला. या माशाचे काही व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर समोर आले असून सध्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
कशी घडली घटना?
मनोरमधील वैतरणा नदीत विकी गोवारी हा 32 वर्षीय तरुण दुपारच्या सुमारास मासेमारीसाठी गेला होता . मात्र याच वेळेस त्याच्यावर 200 किलोहून अधिक वजनाच्या महाकाय माशाने झडप घालत त्याच्या पायाचा तुकडा पाडला . ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली . या तरुणाच्या पायाचा काही भाग हा माशाने खाल्ला आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी दादरा नगर हवेतील विनोबा भावे रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे . सध्या या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.