Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चारा घालणाऱ्या महिलेवर हत्तीचा हल्ला (Watch Video)

चारा घालणाऱ्या महिलेवर हत्तीचा हल्ला (Watch Video)

हत्ती हा तसा शांत प्राणी. पण तो कधी चिडेल आणि चिडला की काय करेल याची खात्री कोणालाच देता येत नाही. सोशल मीडियावर चिडलेल्या हत्तीचे अनके व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाहायला मिळते की, शांतपणे चारा खात असलेल्या हत्तीशी उगाच जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला हत्तीने चांगलाच इंगा दाखवला आहे. सदर महिला हत्तीला चारा घालण्यासाठी गेली होती, असे सांगण्यात येत आहे. तिच्यासोबत हत्तीने नेमके काय केले हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहू शकता.

महिलेच्या खुब्याला लागला मार

व्हिडिओत पाहायला मिळते की, एक हत्ती शांतपणे चारा खात आहे. तिथे एक महिला आणि तिचे काही सहकारी कॅमेरा घेऊन पोहोचले. साधारण तोकड्या कपड्यात असलेली ही महिला हत्तीच्या जवळ गेली. हत्ती शांतच होता. जो चारा खात होता. मात्र, ही अतिउत्साही महिला हत्तीच्या अगदीच जवळ गेली. बहुदा तिच्या जवळ येण्यामुळे हत्तीला असुरक्षीत वाटले असावे. हत्ती अचानक चिडला आणि त्याने आपल्या सोंडेने सदर महिलेला दूर ढकलले. धिप्पाड हत्तीसमोर ही महिला अगदीच दुबळी ठरली. हत्तीने ढकलात ती दूरजाऊन पडली. या महिलेच्या खुब्याला चांगलाच मार लागला. आपली कंबर हातात धरुन दीनवाना चेहरा करत ही महिला कंबर चोळत उठताना व्हिडिओत पाहायला मिळते. उठताना ती वेदनेने विव्हळत असल्याचेही ऐकू येते. 


प्राणीमित्रांकडून सुरक्षेचा सल्ला

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणिमित्रांनी अनेक सल्ले दिले आहेत. जसे की, वन्य प्राण्यांना त्रास देऊ नये. जेव्हा वन्य प्राण्यांना वाटते की, ते असुरक्षीत आहेत तेव्हा ते इशारा देतात. आपण चिडलो असल्याचे आपल्या वर्तनातून दाखवून देतात. हत्तींबाबत बोलायचे तर त्यांचे डोळे काहीसे लाल होतात. ते आपली शेपूट हलवतात. तरीही असुरक्षीतता त्यांच्या अगदीच निकट येत असल्याचे त्यांना जाणवते तेव्हा ते आपल्या सोंडेचा वापर शस्त्रासारखा करतात. 

हत्तींचा हल्ला हा सध्या देशभरात ऐरणीवर आलेला विषय आहे. खास करुन केरळ. अलिकडेच केरळ राज्यातील वायनाड येथे एका वन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ज्यामुळे हत्तींचा मानवांवरील हल्ला वाढल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, वास्तवता अशी आहे की, वाढत्या नागरिकरणामुळे हत्ती आणि इतरही वन्य प्राण्यांच्या अदिवासात मानवाची घुसखोरी वाढली आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.