Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर,2 उमेदवार बदलले

काँग्रेसची आणखी एक यादी जाहीर,2 उमेदवार बदलले 


लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने या यादीत 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये राजस्थानमधील दोन जागांसाठी उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसने राजस्थानमधील राजसमंद आणि भिलवाडा मतदारसंघातील उमेदवार बदलले आहेत.

शुक्रवारी काँग्रेसने 5 उमेदवारांची नवी यादी जाहीर केली. या यादीत राजस्थानमधील दोन उमेदवारांसह कर्नाटकातील लोकसभेच्या तीन जागांसाठीच्या उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. राजस्थानमधील ज्या दोन जागांवर काँग्रेसने उमेदवार बदलले आहेत, त्यात राजसमंद आणि भिलवाडा यांचा समावेश आहे. राजसमंदमधून काँग्रेसने सुदर्शन रावत यांच्या जागी डॉ.दामोदर गुर्जर यांना तिकीट दिले आहे. 

याआधी काँग्रेसने भीलवाडा मतदारसंघातून दामोदर गुर्जर यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. मात्र नव्या यादीत दामोदर गुर्जर यांची जागा बदलण्यात आली आहे. आता त्यांना राजसमंद येथून तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्या जागी भिलवाडामधून सीपी जोशी यांना तिकीट देण्यात आले आहे.

दरम्यान, काँग्रेसने राजस्थानमधील सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी दोन जागांचे उमेदवार बदलण्यात आले आहेत. यासह आता राजस्थानमधील सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या निवडणुकीत भाजपने राज्यातील सर्व जागांवर काँग्रेसचा पराभव केला होता. निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अशातच भाजपने पुन्हा एकदा राज्यात क्लीन स्वीप करण्याची तयारी सुरू केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.