Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर : गीता जाधव यांचा बँकॉकमध्ये 9 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

कोल्हापूर : गीता जाधव यांचा बँकॉकमध्ये  9 व्या मजल्यावरून पडून मृत्यू

राशिवडे : शिरगाव (ता. राधानगरी) येथील सुनील ईश्वरा जाधव यांची पत्नी गीता (वय 45) यांचा थायलंड मधील बँकॉक या शहरात एका बिल्डिंगच्या नवव्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. शिरगाव येथील सुनील जाधव हे पत्नी गीता आणि मुलगा ओंकार (वय 16) यांच्यासह थायलंडमधील बँकॉक इथे नोकरीनिमित्त राहतात. गीता यांचे शिक्षण बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स झाले असून 2003 साली लग्न झाले आहे. काही दिवस दोघेही गोवा येथे नोकरी करत होते. त्यानंतर 2018 पासून थायलंडमध्ये जॉबसाठी वास्तव्य करत आहेत.

शुक्रवार, दि. 22 रोजी सुनील कंपनीमध्ये कामावर गेले होते. त्यामुळे फ्लॅटवर गीता व मुलगा ओंकार हे दोघेच होते. गीता या वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेल्या असता त्यांचा पाय घसरून अथवा तोल जाऊन नवव्या मजल्यावरून पडल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. मुलगा ओंकार बाथरूममध्ये असताना ही घटना घडली.

त्याने वडिलांना फोन करून सांगितले. वडील कंपनीतील अधिकार्‍यांना घेऊन तेथे आले असता त्यांना धक्काच बसला. अशा पद्धतीने पत्नीचा मृत्यू झाल्याने त्यांना काय करावे सुचेना. कंपनीच्या अधिकार्‍यांनी सुनील यांना धीर दिला आणि तेथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून रीतसर सर्व सोपस्कार पूर्ण करून सोमवारी मृतदेह सुनील यांच्या ताब्यात देण्यात आला.

मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान मृतदेह शिरगाव येथे आणण्यात आला. यावेळी गीता यांच्या भाऊ व बहिणींनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती. मुलगा ओंकार याने आईच्या पार्थिवाला अग्नी दिला. गीता यांच्या मागे पती, सासू, मुलगा व चुलत सासरे, दीर असा परिवार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.