Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रीम कोर्टाने झापल्यावर तामळनाडूच्या राज्यपालांनी पोनमुडी यांना दिली शपथ

सुप्रीम कोर्टाने झापल्यावर तामळनाडूच्या राज्यपालांनी पोनमुडी यांना दिली शपथ 

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कठोर शब्दांत कानउघाडणी करत घटनात्मक कर्तव्यांबद्दल झापल्यानंतर आज दुपारी तामीळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी द्रमुक नेते के. पोनमुडी यांना मंत्री पदाची शपथ देत राज्य मंत्रिमंडळात पुन्हा समावेश केला.

राजभवनावरील एका साध्या समारंभात पोनमुडी यांना रवी यांनी पदभार आणि गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलीन, उदयनिधी स्टॅलीन, एम.ए. सुब्रमण्यम असे काही मंत्री उपस्थित होते. पोनमुडी यांच्याकडे उच्च शिक्षण मंत्री पद पुन्हा सोपवण्यात आले आहे. या शपथविधीमुळे स्टॅलीन आणि रवी यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.