Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात देशी दारू दुकानात मद्यपींचा तुफान राडा; मात्र, एकाने कोपऱ्यात गुपचूप उरकला कार्यक्रम

पुण्यात देशी दारू दुकानात मद्यपींचा तुफान राडा; मात्र, एकाने कोपऱ्यात गुपचूप उरकला कार्यक्रम

भांडण झाले म्हटले की ते पाण्यासाठी मोठा घोळका होत असतो. ही भांडणे सोडवण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही, मात्र, त्याची मजा मात्र, सर्वजण घेत असतात. पुण्यात अशीच एक घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ही घटना वाघोली केसनंद येथील देशी दारूच्या दुकानात घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे दुकानात मारहाण सुरू असतांनाही एक मद्यपी निवांत कोपऱ्यात बसून आपला दारू पिण्याचा कार्यक्रम उरकत होता. दुकानात सुरू असलेल्या राड्याचे त्याला काही देणे घेणे नव्हते.

पुण्याजवळील वाघोलीच्या केसनंद रोडवर एक देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात काही व्यक्ति दारू पित बसले होते. दारू पीत असतांना दुकानात एक व्यक्ति या तिघांच्या जवळ येतो. तो दारू पीत असणाऱ्या व्यक्तिंशी सुरवातीला संवाद साधतो आणि नंतर अचानक मारहाण करण्यास सुरुवात करतो. या घटनेमुळे दुकानातिल काही जण घाबरून बाहेर पळाले. या राड्यात त्यांनी दुकानात असलेल्या दारूच्या बाटला उचलून एकमेकांच्या डोक्यात हाणल्या. हा राडा पाहण्यासाठी बाहेर मोठी गर्दी जमली होती. मात्र, आत राडा सुरू असतांना दुकानात मात्र, एक व्यक्ति निवांत बसली होती. त्याला त्याच्या समोर सुरू असलेल्या राड्याचे काही देणे घेणे नव्हते. ही व्यक्ति बाहेर पळून न जाता निवांत कोपऱ्यात बसून दारू पीत राहिली. एवढेच काय तर त्याने त्याची जागा देखील बदलली नाही. ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीत कैद झाली आहे.

व्हिडिओनुसार एक व्यक्ति देशी दारूच्या दुकानात येतांना दिसते. दरम्यान, दुकानात दारू पिणाऱ्या तिघांच्या टेबलापुढे ही व्यक्ति जाते. हे एकमेकांशी बोलत असतांना अचानक त्यांच्यात वाद होतो आणि सर्व जण एकमेकांना हाणामारी करण्यास सुरू करतात. तीन विरुद्ध एक अशी भांडणे सुरू असतांना एक मद्यप्रेमी मात्र, त्याची दारूची बॉटल घेऊन कोपऱ्यात दारू पीत बसला होता. एकीकडे चौघेजण एकमेकांच्या डोक्यांवर दारूच्या बॉटल फोडत होते. तर हा व्यक्ति निवांत दारू पीत बसला होता.

सुरू असलेली भांडण सोडवण्यासाठी एक तरुणमध्ये पडतांना व्हीडिओत दिसते. मात्र कुणीही त्याला जुमानत नाल्याच दिसत. हामाणारी झाल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. राडा सुरू असतांना कोपऱ्यात बसून असलेली व्यक्ति शांतपणे दारू पित आहे. समोर सुरू असलेला राडा जणू काही चित्रपट आहे आणि हा हामाणारीचा चित्रपट पाहून तो दारूचा आस्वाद घेत होता. दरम्यान, हाणामारी करणारा व्यक्ति पीएमपीएलचा कर्मचारी असून हा वाद नेमका कशावरून झाला याचे मात्र, कारण समजू शकलेले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.