Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, पोलिसाने व्यापाऱ्याचा गोळी झाडून केला खून

पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, पोलिसाने व्यापाऱ्याचा गोळी झाडून केला खून

छत्रपती संभाजीनगर :  वाळुज मध्ये चार दिवसाच्या अगोदर व्यापाऱ्याचा खून झाला होता, त्याचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. धक्कादायक माहिती म्हणजे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच व्यापारी सचिन नरोडे यांना संपवले.

ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील अनेक दिवसांपासून व्यापारी नरोडे यांच्या मागावर रामेश्वर काळे होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, 17 मार्चच्या रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने व्यापारी सचिन साहेबराव नरोडे यांच्यावर गोळीबार केला. वाळूज परिसरातील साजापूर शिवारात डोक्यात बंदुकीची गोळी झाडून त्यांचा खून केल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून गुन्हे शाखा आणि वाळूज पोलीस असे पाच पथके आरोपीचा शोध घेत होती.

गुन्ह्याचा शोध करत असताना गुन्हे शाखेच्या एका पथकाला त्यामध्ये यश आले आहे. हा खून ग्रामीण पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पोलिसाने केल्याचे निष्पन्न झाले त्याच्यासोबत एक साथीदार सुद्धा सोबतीला होता. विशेष म्हणजे हा रामेश्वर सिताराम काळे हेडकॉन्स्टेबल लाच लूजपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईमध्ये निलंबित करण्यात आला होता. तर त्याच्यावर 354 प्रमाणे छेडछाडीचा गुन्हा देखील ग्रामीण पोलीस दलात दाखल झालेला आहे. आरोपी पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर सिताराम काळे आणि लक्ष्मण जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.