Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान नरेंद्र मोदीनं कडून आचरसहितेचा भंग, वायुसेनेचे विमान वापरले

पंतप्रधान नरेंद्र मोदीनं कडून आचरसहितेचा भंग, वायुसेनेचे विमान वापरले 

आध्र प्रदेशातील चिलाकालुरीपेट येथील निवडणूक रॅलीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई दलाचे हेलिकॉप्टर वापरले. याप्रकरणी तृणमूल कॉँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी मोदी यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 17 मार्च रोजी पलनाडू लोकसभा मतदारसंघात एनडीएच्या निवडणूक रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीतून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ते हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना दिसत आहेत. याबाबत साकेत गोखले यांनी आंध्र प्रदेश निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. गोखले यांनी याची प्रत सोशल मीडियावरही शेअर केली आहे.

निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. याकडे गोखले यांनी लक्ष वेधत मोदींविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

आसाममध्ये अजूनही मोदींचे सरकारी जाहिरात फलक 

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे पह्टो झळकवणाऱया सरकारी जाहिराती न हटवणाऱया भाजपच्या राज्य सरकारने आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार आसाममधील विरोधी पक्ष काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेनकुमार बोरा आणि तृणमूलचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे स्वतंत्रपणे या तक्रारी केल्या आहेत.

आचारसंहिता जारी होऊनही राज्यात ठिकठिकाणी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांची छायाचित्रे असलेले शासकीय जाहिरातींचे फलक दिसत आहेत. हे आचारसंहितेचे सरळसरळ उल्लंघन आहे. याबद्दल तत्काळ योग्य ती कारवाई करावी आणि राज्य सरकारला या जाहिराती त्वरीत काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या दोघांनीही राजीव कुमार यांच्याकडे केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.