Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बॉडी बनवण्यासाठी लहान मुलांनी खाल्ला साप; त्यानंतर जे घडलं ते...

बॉडी बनवण्यासाठी लहान मुलांनी खाल्ला साप; त्यानंतर जे घडलं ते...

पाटणा : साप म्हणताच अनेकांना घाम फुटतो. पण साप पाळणारे, खाणारेही काही लोक आहेत. शक्यतो असे प्रकार परदेशात पाहायला मिळतात. पण तुम्हाला धक्का बसेल बिहारमध्ये लहान मुलांनी साप खाल्ला आहे. बॉडी बिल्डिंग साठी त्यांनी साप खाल्ला. त्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.

जमुई जिल्ह्यात ही घटना घडली. बरियारपूर गावात मुलांनी सापाची पार्टी केली, म्हणजे सापाचे मांस खाल्ले. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील शेतात मेलेला साप पाहिल्यानंतर मुलांनी आधी तो उचलला आणि नंतर आगीत शिजवून खाल्ला. एका 12-15 वर्षाच्या मुलाने मेलेल्या सापाला आगीत भाजले, त्याला दोन पाच वर्षांच्या मुलांनीही खाल्लं. साप खाल्ल्यानंतर दोन्ही मुलांची प्रकृती खालावली. मुलांनी साप खाल्ल्याचं समजल्यानंतर कुटुंबीयांनी मुलांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.


मृत साप खाण्याबाबत माहिती देताना एका मुलाची आई रुबी खातून म्हणाली की, गावातील एका 15 वर्षाच्या मुलाने शेतातून मेलेला साप उचलला आणि घराच्या पाठीमागील लाकडात शेकोटीत भाजला. त्याच मुलाने माझ्या मुलाला मेलेल्या सापाचा एक छोटा तुकडा खायला दिला. मुमुलांनी साप खाल्ल्याचं समजल्यानंतर आम्ही घाबरलो आणि मुलांना रुग्णालयात उपचारासाठी आणलं.


दुस-या मुलाची आजी जहाना खातून हिनं सांगितलं की, गावातील एका मुलाने तिच्या नातवाला आमिष दाखवून सापाचा शिजवलेला तुकडा खाऊ घातला. त्या मुलाने माझ्या नातवाला आमिष दाखवलं की हे खाल्ल्याने शरीरात शक्ती येईल आणि बॉडी होईल. जर तुम्ही सापाचा तुकडा खाल तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ. असे म्हणत त्यांनी सापाचा शिजवलेला तुकडा माझ्या नातवाला खाऊ घातला.

मुलांसह मेलेल्या सापाचा तुकडा घेऊन हे कुटुंब रूग्णालयात गेलं. दोन्ही मुलांवर डॉक्टरांनी उपचार केले. या प्रकरणी डॉ. घनश्याम सुमन यांनी सांगितलं की, दोन्ही मुलांना काही तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही मुलांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.