Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत उद्धव साहेब यांची भेट घेऊन सांगली लोकसभेच्या जागा विषय करणार चर्चा : राज्य प्रवक्ते संतोष पाटील.

मिरजेत उद्धव साहेब यांची भेट घेऊन सांगली लोकसभेच्या जागा विषय करणार चर्चा : राज्य प्रवक्ते संतोष पाटील.


सांगली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस पार्टीच्या नेत्यांमध्ये विशेषता दोन्हीही पार्टीने आपापले उमेदवार जाहीर केल्यामुळे सांगलीच्या महाविकास आघाडीच्या गटामध्ये अस्वस्थ पसरले आहे. स्वर्गीय दिवंगत वंदनीय बाळासाहेब ठाकरे व दिवंगत मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे नाते काय होते हे यापूर्वी महाराष्ट्राने बघितले आहे.

त्यामुळे सांगलीच्या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पार्टीमध्ये एकमत होऊन काँग्रेसचाच उमेदवार मिळेल अशी आशा आहे.. सांगलीची वास्तविक परिस्थिती समजून देण्यासाठी आम्ही  माननीय उद्धव साहेब हे मिरजेत सभेसाठी येणार आहेत त्यावेळेला त्यांची मिरजेत भेट घेऊन सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.

यामध्ये अनेक वेळा सांगलीच्या काँग्रेसमध्ये एकेकाळी सहा ते सात विधानसभेचेआमदार निवडून आले आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील,स्वर्गीय पतंगराव कदम साहेब, स्वर्गीय मदन भाऊ पाटील, माननीय.प्रतीक दादा पाटील,हे मंत्री होते.

तसेच अनेक वर्ष सांगली लोकसभेचे खासदार म्हणून माननीय प्रकाश बापू पाटील होते. तसेच राज्यसभेचे अनेक खासदार होते यामध्ये स्वर्गीय डी जी पाटील साहेब. विधान परिषदेचे कायम दोन-तीन आमदार काँग्रेसचे होते तसेच अनेक वर्ष जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व होते महानगरपालिकेवरही अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती. तसेचअनेक नगरपालिका अनेक पंचायत समिती याच्यावरती काँग्रेसचीच हुकूमत होती आणि आहे,त्यामुळे या सांगली जिल्ह्यात काँग्रेसचाच उमेदवार असणे गरजेचे आहे.

कारण सांगली जिल्ह्यात 70 टक्के मतदान हे काँग्रेसचेच आहे शिवाय सांगली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री राहिलेले व ज्यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हा लढत आहे असे माननीय विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम साहेब यांनी लोकसभेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे त्यामुळे महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे माननीय विशाल दादा पाटील यांना एक मुखी आपण पाठिंबा देऊन सांगली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या गटातून तिकीट देऊन त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणावे अशी चर्चा करण्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेणार आहोत. अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांना दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात माहिती दिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.