ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमर अब्दुलाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न!
ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आज(२४ मार्च) ओमर अब्दुल्लाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.पोलिसांनी हस्तक्षेप करून ओमर अब्दुल्लाचा पुतळा जमावाकडून हिसकावून नेण्यात आल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यास विरोध केल्याने ओमर अब्दुल्लाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.दरम्यान, महाराष्ट्र भवनासाठी राज्य सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये २.५ एकर जमीनही खरेदी केली आहे.
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भवनाबाबत विधान केले होते.ते म्हणाले होते की, आम्ही सत्तेत आल्यास महाराष्ट्र भवनाचे बांधकाम थांबवू. ओमर अब्दुल्लाच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली. या संदर्भात आज ठाण्यातील टेंभी नाका येथे युवासेना अध्यक्ष नितीन लांडगे आणि शिवसेना प्रवक्ते राहुल लांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ज्यामध्ये ओमर अब्दुल्ला यांचा पुतळा बनवून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, कलम ३७० रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून २.५ एकर जमीन खरेदी केली आहे.या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे.राज्यातील पर्यटकांना व भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सेवा मिळाव्या यासाठी श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे.जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी अतिथीगृह बांधणारे महाराष्ट्र सरकार पहिले सरकार ठरले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.