Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जनसुराज्यला भाजपने विधानसभेच्या ७ जागा द्याव्या - आमदार विनय कोरे

जनसुराज्यला भाजपने विधानसभेच्या ७ जागा द्याव्या - आमदार विनय कोरे

सांगली : विधानसभा निवडणुकीत भाजपने मित्र पक्ष म्हणून मिरज व जतसह राज्यात सात जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सन्मानाने द्याव्यात असे आवाहन पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष आ. विनय कोरे यांनी मिरजेत केले. जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा संवाद मेळावा सोमवारी रात्री झाला. या मेळाव्यात आ. कोरे बोलत होते.

यावेळी आ. कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष समित कदम, विजयसिंह माने, प्रदिप देशमुख, प्रदिप पाटील, काकासो चव्हाण, संजय माने, प्रकाश माने, प्रविण जाधव, ए. बी. पाटील आदींची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी आ. कोरे म्हणाले, देशात राष्ट्रीय विचाराचे सरकार यावे या भूमिकेतून जनसुराज्य शक्ती पक्ष आपली जबाबदारी पार पाडेल. मात्र राज्यात भाजपाने मित्रत्वाची भूमिका कायम ठेवली पाहिजे. राज्यात मिरज, जत आणि कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा आणि नाशिक मतदार संघातील जागा आमच्या पक्षाला मिळाल्याच पाहिजेत अशी आमची मागणी आहे.

यावेळी स्वागत प्रास्तविकात प्रदेशाध्यक्ष श्री.समित कदम म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात संघर्षातून पक्ष विनयजी कोरे यांनी उभा केला. पक्षाने विधानसभेत जनतेचे प्रश्न सोडवले म्हणून पक्ष वाढला. पक्षाने मराठा आरक्षणाचे समर्थन करत असताना लिंगायत समाजाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. यामुळे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण व लिंगायत समाजासाठी महामंडळाची घोषणा झाली असे सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.