Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नराधम सासऱ्याचा सुनेवर बलात्कार ! तालुक्यात संतापाची उसळली लाट

नराधम सासऱ्याचा सुनेवर बलात्कार ! तालुक्यात संतापाची उसळली लाट

नेवासा:  सासऱ्यानेच चक्क सुनेवर बलात्कार करुन घडला प्रकार कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात नराधम सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक घटना माळीचिंचोरा (ता.नेवासा) येथे घडल्यामुळे तालुक्यात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की,माळीचिंचोरे (ता.नेवासा) येथील बलात्कारीत विवाहितेच्या महिलेचा पती बँण्ड वाजविण्याच्या कामासाठी बाहेरगावी जात असल्यामुळे नराधम सासऱ्याची वाईट नजर सुनेवर जाऊन “तु मला खुप आवडतेस” असे म्हणून सुन घरी एकटीच असल्याचा गैरफायदा घेवून नराधम सासऱ्याने सुनेचा हात धरुन तीच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग केल्याची संतापजनक घटना माळीचिंचोरे (ता.नेवासा) येथे घडल्यामुळे नराधम सासऱ्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे तालुक्यासह परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेची सविस्तर अधिक हकीगत अशी की, माळीचिंचोरा (ता.नेवासा) येथील विवाहिता (हल्ली रा.दहिफळ ता.शेवगांव) या एकविस वर्षिय विवाहितेचा पती बँँण्ड वाजविण्याचे काम करतो,घरातील विवाहितेची सासू – दिर घरातून कामासाठी बाहेर जात असल्याचा गैरफायदा उठवत नराधम सासऱ्याचीच चक्क सुनेवर वाईट नजर जावून तीच्याशी नराधम सासऱ्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता या कृत्याला सुनेने वेळोवेळी विरोध केला असता “तुला घरात ठेवणार नाही”,तुझे नांदणे अवघड होईल,अशी धमकी देत सन २०२३ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत आपल्या सुनेवर नराधम सासरा नामे बबन हरीभाऊ शेंडे याने वेळोवेळी सुनेवर इच्छेविरुद्ध बलात्कार केल्याची घटना माळीचिंचोरे (ता.नेवासा) येथे घडल्यामुळे या कृत्या विरोधात सुनेने दिलेल्या फिर्यादीवरुन नराधम सासऱ्या विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे तालुक्यात या घटनेचा तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.