Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तोंडाचा वास आल्याने भडकला ; झोपेत असलेल्या तरुणाला दगडाने ठेचून मारलं

तोंडाचा वास आल्याने भडकला ; झोपेत असलेल्या तरुणाला दगडाने ठेचून मारलं

एका तरुणाच्या क्रूरतेची कहाणी जाणून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तोंडातून दारूचा वास येत असल्याने एका तरुणाने रेल्वे स्थानकावर झोपलेल्या व्यक्तीची हत्या केली. पोलिसांनी मारेकऱ्याला अटक करून तुरुंगात पाठवलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. तरुणाच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याने आरोपीने खून केल्याचं कारण सांगितलं आहे.

खुनाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मूळ यूपी मथुरा येथील आरोपीला जीआरपीने अटक केली आहे. 7 मार्च रोजी रेल्वेच्या गेट क्रमांक तीनजवळ तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर खोल जखम दिसत होती. खूप प्रयत्न करूनही त्याची ओळख पटू शकली नाही. या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी एसओ अनुज सिंग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करण्यात आलं.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलीस पथकाने एका संशयिताची ओळख पटवली होती. शनिवारी पोलीस पथकाने आरोपी घनश्याम याला रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. आरोपी तरुणाने कबुली दिली, की हत्येच्या वेळी मयत व्यक्ती झोपला होता. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत होता. त्यामुळे हत्या केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट दिसत आहे. आरोपी त्याच्यावर दगडाने वार करत होता.

सीसीटीव्ही फुटेज मिळालं असलं तरी आरोपीचा चेहरा स्पष्ट होत नव्हता. पांढरा कुर्ता आणि काळी पँट यावर लक्ष केंद्रित केलं गेलं. सुमारे दोनशे कॅमेऱ्यांचा शोध घेतल्यानंतर हेड कॉन्स्टेबल पृथ्वीसिंग नेगी आणि कॉन्स्टेबल महेश त्याच्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले.

अंदाजे तीस वर्षांचा आरोपी घनश्याम हा मनोरुग्ण असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. विनाकारण ही हत्या केल्याचं समोर आल्याने पोलीसही चक्रावून गेले. जर आरोपीला अटक केली नसती तर तो इतर अनेकांनाही ठार करू शकला असता, असं पोलीस अधिकारी म्हणाले. गेल्या एक वर्षापासून तो त्याच्या घरी गेला नाही. चौकशी केली असता तो विचित्र गोष्टी सांगत होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.