Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर चौकात ट्राफिक सिग्नल मंजूर करून शुभारंभ : आमदार सुधीरदादा गाडगीळ

कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर चौकात ट्राफिक सिग्नल मंजूर करून शुभारंभ : आमदार सुधीरदादा गाडगीळ
                                                                   
सांगली ५ मार्च २०२४ : कुपवाड रोड श्री.लक्ष्मी मंदिर चौक येथील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्वयंचलित ट्राफिक सिग्नलचे भूमिपूजन माननीय आमदार श्री. सुधीर दादा गाडगीळ यांचे हस्ते संपन्न झाले. लक्ष्मी मंदिर चौकामध्ये वारंवार अपघात होत होते त्यामुळे तेथील नागरिक व भाजपा पदाधिकारी वारंवार आंदोलन  व मागणी करत होते याची दखल घेऊन लक्ष्मी मंदिर चौकामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत करणेकामी नविन वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारणी करणेस जिल्हा वार्षिक योजने तून सदर कामास आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी मंजुरी मिळवून सदर सिग्नलला र.रू.१२,५०,००२/- इतका निधी उपलब्ध करून दिला.

 सदर निधी जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेस वर्ग झालेला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, व अपघात नियंत्रण करणे साठी लक्ष्मी मंदिर चौकामध्ये सिग्नल यंत्रणा करणे. आवश्यक होते. लक्ष्मी मंदिर चौकात ट्राफिक सिग्नलचे भूमिपूजन झाल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक व आनंदी वातावरण आहे. सदर भूमिपूजना वेळेस  उपायुक्त  राहुल रोकडे  ,   उपायुक्त स्मृती पाटील, (विद्युत अभियंता) अमरसिंह चव्हाण, माजी नगरसेवक  राजेंद्र कुंभार, विष्णू माने, प्रशांत पाटील,  कल्पना कोळेकर, जमीर रंगरेज, मोहन जाधव, विश्वजीत पाटील, सुनील भोसले, श्रीकांत वाघमोडे, रवींद्र ढगे, प्रवीण कुलकर्णी, राजू पठाण, अतुल माने तसेच वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते...


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.