Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंटरनेट विना ही वापरता येते व्हाट्सअँप,'या ' फीचरबद्दल अनेकांना माहितीच नाही..

इंटरनेट विना ही वापरता येते व्हाट्सअँप,'या ' फीचरबद्दल अनेकांना माहितीच नाही..

व्हॉट्सॲपवर हा सर्वात प्रसिद्ध चॅटिंग ऍप आहे. भारतातच काय तर जगभरातील लोक याचा वापर करतात. लोक ऑफिसच्या कामांपासून ते आपल्या मित्रांसोबत गप्पा मारणे, फोटो अपलोड आणि शेअर करणे यांसारख्या गोष्टी येथे करतात. कंपनी देखील आपल्या युजर्सचा एक्पिरियन्स आणखी चांगला करण्यासाठी प्रयत्नशील असते.

व्हॉट्सॲप आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे फीचर्स नेहमीच आणत असते. परंतू अनेकांना या फीचर्सबद्दल माहिती नसते, ज्यामुळे त्यांना याचा योग्य वापर करता येत नाही. असंच एक फीचर म्हणजे इंटरनेट शिवाय व्हॉट्सॲप वापरणे. आता तुम्ही म्हणाल की इंटरनेट शिवाय कसा हा ऍप वापरणार? पण व्हॉट्सॲपनं असं एक फीचर आणलं आहे, ज्याअंतर्गत तुम्ही विना इंटरनेट देखील हे ऍप वापरु शकता.

आम्ही WhatsApp च्या प्रॉक्सी फीचरबद्दल बोलत आहोत, जे कंपनीने गेल्या वर्षी लॉन्च केले होते. या फीचरच्या मदतीने तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट नसतानाही व्हॉट्सॲप वापरू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट करावे लागेल. कंपनीचे म्हणणे आहे की प्रॉक्सी वापरल्याने वापरकर्त्यांच्या उच्च स्तरीय गोपनीयता आणि सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही. वापरकर्त्यांचे कॉल आणि संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहतील. याचा अर्थ असा की प्रॉक्सीद्वारे व्हॉट्सॲप ऍक्सेस केल्यानंतरही इतर कोणीही तुमचे मेसेज आणि कॉल्स ऍक्सेस करू शकणार नाही.

व्हॉट्सॲपला प्रॉक्सीशी कसं जोडायचं?

सर्वप्रथम तुमच्याकडे व्हॉट्सॲपचे अपडेटेड व्हर्जन असावे. जर तुमच्याकडे व्हॉट्सॲपची नवीनतम आवृत्ती असेल, तर तुम्हाला ॲप उघडावे लागेल. यानंतर तुम्हाला वर दिसलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला सेटिंगचा पर्याय मिळेल.

यावर क्लिक केल्यावर तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रॉक्सीमध्ये जावे लागेल. आता तुम्हाला Use Proxy वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला सेट प्रॉक्सी वर टॅप करावे लागेल आणि नंतर प्रॉक्सी पत्ता प्रविष्ट करावा लागेल. मग तुम्हाला तो पत्ता सेव्ह करावा लागेल. पत्ता एंटर केल्यानंतर तुम्हाला हिरवे चेक मार्क दिसल्यास, याचा अर्थ तुम्ही प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट झाला आहात.

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट केल्यानंतरही तुम्ही संदेश पाठवू शकत नसाल किंवा कॉल करू शकत नसाल, तर तुमचे प्रॉक्सी नेटवर्क ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. तुम्ही त्या पर्यायावर दीर्घकाळ दाबून ब्लॉक प्रॉक्सी नेटवर्क हटवू शकता आणि नंतर नवीन प्रॉक्सी एड्रेस जोडू शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.