Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हॉर्न वाजवणा्यावरून डॉक्टरवर जीवघेणा चाकू हल्ला

हॉर्न वाजवणा्यावरून डॉक्टरवर जीवघेणा चाकू हल्ला 

चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडवरील रस्त्यावर दुचाकीचा हार्न वाजविल्याच्या कारणावरून डॉक्टरावर चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी २५ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २६ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजता एकावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शहरातील काँग्रेसवाडी परिसरात राहणारे डॉ. हरीष रमाकांत दवे वय ६६ हे आपल्या पत्नी कुमुद दवे यांच्या सोबत दुचाकी क्रमांक (जीजे ०४ सीजे ४५७) ने चाळीसगाव शहरातील स्टेशनरोडवरील रस्त्याने सोमवारी २५ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जात होते. त्यावेळी त्यांनी पुढे जात असलेल्या रिक्षाला हॉर्न वाजविला. त्यावेळी बाजूला उभा असलेला संभा देशमुख याने शिवीगाळ करत तु मला बघुन हॉर्न का वाजवला, तु मला ओळखत नाही का, मी संभा देशमुख आहे. थांब तुला अद्दल घडवतो असे सांगून हातातील चाकूने गळ्यावर, हनुवटीवर आणि हातावर वार करून दुखापत केली. जखमीवस्थेत डॉ. हरीष दवे यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

याप्रकरणी मंगळवार २६ मार्च रोजी रात्री १२.३० वाजता संशयित आरोपी संभा देशमुख याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय संदीप घुले हे करीत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.