Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसभेत शिंदेंच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता होणार कट! भाजपा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत

लोकसभेत शिंदेंच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता होणार कट! भाजपा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत

भाजपा  अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा सोडण्याच्या तयारीत आहे  तर एकनाथ शिंदेंच्या  शिवसेनेला  केवळ ७ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २३ जागा लढवून त्यापैकी १८ जिंकल्या. या १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदेंसोबत गेले. पण भाजपने शिंदेंना केवळ ७ जागा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे शिंदेंच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाऊ शकतो, असे वृत्त न्यू इंडियन एक्स्प्रेसने सुत्रांच्या संदर्भाने दिले आहे. 

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून वातावरण तापले आहे. लोकसभेत मित्रपक्षांना फारशा जागा न देता आपणच बहुतांश जागा लढवण्याचा विचार भाजपाचा आहे. हुकमी विजय मिळेल अशा मित्रपक्षांच्या जागांवर देखील भाजपाकडून दावा केला जात आहे. यामुळे लोकसभेत शिंदेना सर्वात मोठा फटका बसू शकतो. भाजपा नेते मित्रपक्षांच्या मतदारसंघांवर दावा करत असल्याने नुकतेच रामदास कदम, गजानन किर्तीकर या शिंदे गटाच्या नेत्यांनी जाहीरपणे भाजपाला सुनावले होते.

कारण, शिंदेंचे खासदार असलेल्या अनेक जागांवर भाजपने दावा केला आहे. शिंदें पुत्राच्या कल्याण मतदारसंघावर सुद्धा भाजपने दावा केला आहे. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर देखील सामंत बंधु, मुख्यमंत्री असलेले प्रमोद सावंत, नारायण राणे इत्यादी भाजपा नेते दावा करत आहेत. त्यामुळे भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन जरी खुश केले असले तरी त्याची किमत लोकसभेला कमी जागा घेऊन शिंदे गटाला चुकवावी लागू शकते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.