एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; कारण ऐकून थक्क व्हाल
पुणे: पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका तरुणाचा दगड घालून खून करण्यात आला आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात हा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. बसवराज गजेंत्रे (वय 26, मार्केटयार्ड) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
नेमकं घडलं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथे अप्पर इंदिरानगर परिसरात नियोजित व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी अनेक दुकानांसाठी गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र तेथील एका गाळ्यामध्ये तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी त्या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे समोर आले. बसवराज चिदानंद गजंत्रे असं या मृत तरुणाचं नाव आहे. त्याने नातेवाईकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरले होते. तो वाईटसाईट बोलला होता, यामुळेच वाद झाला आणि संशयित आरोपीने त्याच्या डोक्यात लोखंडी पाईप आणि दगड घालून मारहाण केली.
मारहाणीतस बसवराज हा गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं सांगण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. एका संशयिताला ताब्यातही घेण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

.jpeg)
