खिचडी चोराचा मी प्रचार करणार नाही :, संजय निरुपम
महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 17 जणांना उमेदवारी दिली आहे. यात मुंबई वायव्य या मतदार संघातून ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे.
त्यांच्यावर कोवीड काळात खिचडी घोटाळा केल्याचे आरोप आहेत. यावर बोट ठेवत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खिचडी चोराचा प्रचार करणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.