Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत कोयता, तलवार घेऊनफिरणाऱ्या दोघांना अटक

सांगलीत कोयता, तलवार घेऊनफिरणाऱ्या दोघांना अटक

सांगली :  शहरातील राममंदिर चौक आणि शामरावनगर मध्ये हातात तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून कोयता, तलवार जप्त करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

समीर सलीम मुल्ला (वय ३२ रा. शामरावनगर) आणि नितीन सुरेश हुलवान (वय २३ रा. खणभाग, सांगली) असे कारवाई केलेल्यांची नावे आहेत. हुलवान हा राममंदिर रिक्षा स्टॉप जवळ स्वतःजवळ कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ताब्यात घेण्यात आले. काल सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास संशयित समीर मुल्ला हा शामरावनगर परिसरात तलवार घेऊन फिरताना ताब्यात घेतले.  निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, सुमित सूर्यवंशी, योगेश सटाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.