Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेत अॅड. एस.पी. मगदुम व श्री. लालासाहेब थोटे यांचा याढदिवसा निमित्त सत्कार

कर्मवीर पतसंस्थेत अॅड. एस.पी. मगदुम व श्री. लालासाहेब थोटे यांचा याढदिवसा निमित्त सत्कार

सांगली : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित.. सांगली चे संस्थापक संचालक अॅड. एस.पी. मगदुम यांचा ७७ वा आणि तज्ञ संचालक श्री. लालासाहेब 'भाऊसाहेब थोटे यांचा ७९ वा वाढदिवस संस्थेत साजरा करुन त्यांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दिनांक १ मार्च रोजी दोघांचा वाढदिवस असतो.

स्वागत प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी अॅड. एस. पी. मगदुम व श्री. लालासाहेब थोटे यांच्या व्यावसायिक, व्यावहारीक व व्यवस्थापनातील ज्ञानाचा संस्थेला खुप मोठा फायदा फायदा झाला आहे असे उद्गार दोघांचा सत्कार करताना काढले. संस्थेला अगदी लहान आवस्थेतून आजच्या स्थितीला आणण्यात संस्थापक संचालकां चा मोठा वाटा असून त्यामध्ये या दोघांची भुमिका महत्वाची होती. ज्या ज्या वेळी एखादा आडचणीचा प्रसंग असेल किंवा तज्ञ सल्ल्याची आवश्यकता असेल त्या त्या वेळी या दोघांनीही संस्थेला योग्य सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले, तसेच या दोघांना सुख समाधान व दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी प्रदिर्घ प्रवासातील निखळ मैत्रीच्या अनेक आठवणी सांगून जुन्या मैत्रीला उजाळा दिला.

संचालक श्री. ओ. के. चौगुले (नाना) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, दोघांनाही संस्थात्मक कामाचा चांगला अनुभव आहे. कमी बोलणे व प्रत्यक्ष कार्य तडीस नेणे हा या दोघांचा स्थायीभाव आहे. अत्यंत निर्गर्वी व्यक्तीमत्व लाभले. त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. समाधान हा या दोघांच्यामध्ये आढळणारा दुर्मिळ गुण आहे. त्यामुळे ते आयुष्यात समाधानी आहेत. ते एक चांगले मित्र असून ही मैत्री गेली ५० वर्षापासून सुरु आहे.

यावेळी सत्कार मुर्तीच्या सौभाग्यवती सौ. ललिता श्रीमंधर मगदुम व सौ. शैलजा लालासो थोटे यांना देखील पुष्पगुच्छ देवून त्यांना पुढील सुखी संपन्न आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्कारास उत्तर देताना दोन्ही सत्कार मुर्तीनी आयुष्यामध्ये चांगले मित्र लाभल्यामुळे आयुष्यात सुखमय झाले व आयुष्य सत्कारणी लागल्याचे सांगितले, जीवनामध्ये कार्य करीत असताना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून कार्य केल्यामुळे मान सन्मान मिळाले त्यातून कार्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले, कर्मवीर पतसंस्थेने केलेला सत्कार हा घरचा सत्कार असून तो आयुष्यातील संस्मरणिय क्षण आहे असे सांगितले व सत्काराबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू, डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती आप्पासो चोपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांचे सह सत्कारमुर्तीचे नातेवाईक, मित्र व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.