Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तिकीट नाकारल्याने विषारी औषध प्राशन केलेल्या खासदाराचा मृत्यू

तिकीट नाकारल्याने विषारी औषध प्राशन केलेल्या खासदाराचा मृत्यू

कोईम्बतूर :  लोकसभा निवडणुकीचे तिकिट नाकारल्यामुळे किटकनाशक प्राशन केलेले इरोड येथील मारूमालार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके) पक्षाचे खासदार ए गणेशमूर्ती यांचे आज (दि.२८ मार्च) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

२४ मार्च रोजी गणेशमूर्ती यांनी टोकाचे पाऊल उचलत कीटकनाशक करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर कोईम्बतूरमधील येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

२४ मार्च रोजी सकाळी ७६ वर्षीय गणेशमूर्ती यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या होऊ लागल्या. कीटकनाशक प्राशन केले असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यांना तत्काळ इरोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोईम्बतूरमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले होते. आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.