Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा समाजाच्या बैठकीत लाथा -बुक्क्यानी मारहाण :, उमेदवाराकडून पैसे घेतल्याचा आरोप

मराठा समाजाच्या बैठकीत लाथा -बुक्क्यानी मारहाण :, उमेदवाराकडून पैसे घेतल्याचा आरोप 

लोकसभा निवडणुकीत मराठा समाज  चे उमेदवार देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यात दोन गटातील झालेल्या मतभेदांमुळे प्रचंड राडा झाला. एकीकडे राजकारणी एकमेकांवर आरोप करत असताना राज्यात मराठा समाजाच्या बैठकीतही आरोप प्रत्यारोप झाले. नंतर त्याचे रुपांतर जोरदार हाणामारी त झाले. देन्ही गटांनी उमेदवारांकडून पैसे घेतल्याच्या आरोप केले. त्यामुळे सगळा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

याच बैठकीत महिला कार्यकर्त्या देखील उपस्थिती होत्या. बैठक सुरु असतानाच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. शहरातील मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजाच्या बांधवांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या गोंधळामुळे ही बैठक स्थगिक करण्यात आली. या हाणामारीनंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा पोहोचला. पोलिसांकडून घटनास्थळी शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत

या राड्यानंतर मराठा समाजाकडून संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विकी पाटील,बाळू औताडे अशी काही तरूणांकडून मारहाण झाल्याचे समोर येत आहे. यांच्याशिवाय अन्यही काही लोक आहेत. पोलीस सध्या तपास करत आहेत. कोणी कोणाच नाव घेऊन बोलायच नाही, असं ठरलेलं. काही मतभेद असतील, तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायच असं ठरलेलं. मात्र काही जणांची नाव पुढे आली आहेत. त्यावरुन वादावादी झाली, असं समोर आलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.