Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महूद गावात अचानक स्फोट; आटपाडीच्या एकाचा मृत्यू, एक जण गंभीर

महूद गावात अचानक स्फोट; आटपाडीच्या एकाचा मृत्यू, एक जण गंभीर


सांगोला :  राहत्या घरात झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर भाजल्याने जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. जखमींवर पंढरपुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान मृत अतुल बाड याच्या नातेवाईकांनी मुलाच्या घातपाताचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास महूद (ता सांगोला) येथील दिघंची रोडवरील एका बिल्डिंगमध्ये घडली. अतुल आत्माराम बाड (वय २७, रा. विठ्ठलापूर ता आटपाडी ) असे मृताचे नाव आहे तर दिपक विठोबा कुटे (रा. शिवापुरी ता. आटपाडी) असे जखमीचे नाव आहे. दरम्यान मध्यरात्री स्फोटाच्या आवाजाने सुमारे १ किमी परिसर हादरून गेल्याने लोक घराबाहेर पळाले तर स्फोटात बिल्डिंग चौफेर अक्षरशा उध्वस्त झाली. समोरील शटर सुमारे २५० फूट अंतरावर जाऊन फेकले गेले. दुर्घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला तातडीने पंढरपूर येथे उपचार करता हलविले. सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयासमोर मृत अतुल बाड याच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.