Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिला डॉक्टरने इंजेक्शन टोचून घेत संपवलं जीवन, पत्रात पोलिसावर गंभीर आरोप

महिला डॉक्टरने इंजेक्शन टोचून घेत संपवलं जीवन, पत्रात पोलिसावर गंभीर आरोप

एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या परिसरातच महिलेने जीवन संपवलं. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. मृत महिला डॉक्टरने १५ पानी सुसाइड नोट लिहिली असून त्यात पोलीस निरीक्षकावर छळाचा आरोप केला आहे. आता पोलिसात या प्रकऱणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून महिला डॉक्टर आणि पोलीस अधिकारी यांच्यात काय संबंध होता याचा तपास केला जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी अहमदाबादच्या गुन्हे शाखेच्या कार्यालय परिसरात EOWच्या ऑफिसबाहेर एका बेंचवर महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह वैशाली जोशी नावाच्या महिला डॉक्टरचा होता. मृतदेहाजवळ इंजेक्शनही आढळून आले. यानंतर अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, खेडा जिल्ह्यातील बालासिनोरमध्ये राहणाऱ्या वैशाली जोशी हिने खासगी क्लिनिक सुरू केलं होतं. गेल्या २ आठवड्यापासून ती व्हीके खाचर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न करत होती. वैशाली अहमदाबादमधील शिवरंजनी परिसरात भाड्याने राहत होती.

वैशालीच्या पर्समध्ये १५ पानी सुसाइड नोट आढळली आहे. सुसाइड नोटमध्ये गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्हीके खाचर यांच्यावर छळाचा आरोप केला आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुन्हे शाखेत असलेल्या पोलीस निरीक्षक खाचर आणि महिला डॉक्टर यांच्यात गेल्या चार पाच वर्षांपासून संबंध होते. त्यांच्या नात्यात काही महिन्यांपासून बिनसलं होतं. यामुळे महिला डॉक्टर नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली.

याप्र्करणी व्हीके खाचर यांच्याविरुद्ध कारवाई करणार का? यावर पोलीस अधिकारी एचटी भाटी यांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आम्ही यावर काही अंदाज व्यक्त करू शकत नाही. पोलीस निरीक्षक व्हीके खाचर यांच्याविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.