Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवडणुकानंतर पंतप्रधान मोदी सरकार भारताच संविधान बदलणार ? रामदास आठवले म्हणाले,'.बदलणं!'

निवडणुकानंतर पंतप्रधान मोदी सरकार भारताच संविधान बदलणार ? रामदास आठवले म्हणाले,'.बदलणं!'

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. अशात त्यांनी पुन्हा एकदा केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईत एका कार्यक्रमासाठी उपस्थित रामदास आठवले यांनी आगामी राजकीय भवितव्याविषयी भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?

रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले,’२०२४ च्या निवडणुकांमध्ये मोदीसह एनडीएमध्ये राहणार आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए जिंकणार असून यानंतर मी मंत्री होणार आहे.

या निवडणुकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार भारतातच संविधान बदलणार असल्याचा आरोपांवर प्रतिउत्तर देत पुढे म्हणाले,नरेंद्र मोदींनी नवीन संसद भवनाला 'संविधान सदन' हे नाव दिलं आहे. २६ नोव्हेंबर हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून देशभर पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे मोदी संविधान बदलणं शक्य नाही. संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आपण सगळे आहोतच", अशा शब्दांत रामदास आठवले यांनी मोदींना समर्थन दिलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.