Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संत निरंकारी मिशनद्वारा सलगरे येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३२७.जणांनी केले रक्तदान….!"

संत निरंकारी मिशनद्वारा  सलगरे येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३२७.जणांनी केले रक्तदान….!"


सलगरे(मिरज): १२मार्च, २०२४ : निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सांगली सेक्टर मध्ये सलगरे शाखा* येथे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा 'संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन'* च्या वतीने मंगळवारी  दिनांक १२/०३/२०२४ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी संत्संग भवन सलगरे  येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये *३२७.  निरंकारी भक्तांनी  निस्वार्थ भावनेने* रक्तदान केले. निरंकारी भक्तांबरोबर अनेक सज्जनांनी ही या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. पद्मभूषण वसंत दादा पाटील रक्तपेढी सांगली व मिरज आणि शिरगावकर ब्लड बँक सांगली यांनी रक्त संकलन करण्याचे कार्य केले.
  
 
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री. तानाजी पाटील. सरपंच ग्रामपंचायत सलगरे ) व श्री. जगन्नाथ निकाळजे  क्षेत्रीय संचालक सांगली   यांचे शुभ हस्ते  व श्री.सुरेश कोळेकर, श्री. विजय पाटील  सह श्री. शिवाजी काशीद उद्योजक, रवींद्र वस्त्र निकेतनचे श्री रवींद्र अथणे व श्री. दत्तात्रय यादव (श्री दत्त इलेक्ट्रिकल & हार्डवेअर)  यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाले.  यावेळी  श्री सुशांत (दादा) खाडे सह अनेक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी या शिबिरास सदिच्छा भेट देऊन मिशनच्या कार्याचे कौतुक केले आणि मिशनच्या सामाजिक योगदानासाठी शुभेच्छा दिल्या.
    
संत निरंकारी मिशन द्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे १९८६ मध्ये संत निरंकारी समागम मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी निरंकारी बाबा हरदेव सिंहजीं महाराज* यांनी मानवतेला संदेश दिला की “रक्त नाल्यांमध्ये नाही तर नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे”.संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश आज वर्तमान काळात निरंकारी 'सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज' यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे चालू ठेवला आहे. 

वरील रक्तदान शिबिर श्री सागर खोत (संचालक, सलगरे सेवादल ) यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीरित्या संपन्न होणे करिता सर्व सेवादल आणि निरंकारी भक्तांचे योगदान लाभले. आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार सलगरे शाखेचे मुखी श्री. संदीप साळुंखे यांनी मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.