Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

नवी दिल्ली :  आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. निवडणूक आयुक्तांचा राजीनामा अशा वेळी आला आहे जेव्हा देशात काही आठवड्यांत लोकसभेचे निवडणुक होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यामागील कारणाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आला आहे. मात्र, निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

दरम्यान, शुक्रवारीच निवडणूक आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालय आणि रेल्वे अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेबाबत बैठक घेतली होती. ज्यामध्ये देशभरात सुरक्षा जवानांच्या तैनातीबाबत चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकांव्यतिरिक्त, निवडणूक आयोगाला आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका घ्यायच्या आहेत. निवडणूक आयोगाचे पथक सर्व राज्यांचा दौरा करुन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. एप्रिल-मेमध्ये देशात लोकसभा निवडणुका होऊ शकतात, असा अंदाज आहे.

दुसरीकडे, अरुण गोयल यांच्या या निर्णयानंतर आता निवडणूक आयोगात 2 पदे रिक्त आहेत. अरुण गोयल यांनी 21 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 1985 च्या बॅचचे IAS अधिकारी, अरुण गोयल यांनी यापूर्वी भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.