मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षासोबत आता वंचित बहुजन आघाडी राहिलेली नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. 'आता जर महाविकास आघाडीसोबत जमलं तर आघाडी आहे, नाही जमलं तर नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. आमची आधी शिवसेनेसोबत आघाडी होती, पण शिवसेनेने महाविकास आघाडीला प्राधान्य दिलं, असेही आंबेडकर म्हणाले.
चिखलीकर- चव्हाण यांच्या लढतीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला
आजच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, "नाही आता शिवसेना ठाकरे गटासोबत आमची आघाडी राहिली नाही. महाविकास आघाडीत जायचं असेल तर आपण आधी(शिवसेना-वंचित) बसून बोललं पाहिजे. जागा ठरवल्या पाहिजे, त्यानंतर महाविकास आघाडीत बोलू. या काही गोष्टी फॉलो झाल्या नाहीत. ठाकरेंसोबत आमची आघाडी राहिली नाही. आता महाविकास आघाडीत जमलं तर आमची आघाडी आहे, नाहीतर नाही."
शाहू महाराजांना पाठिंबा -
प्रकाश आंबेडकर म्हणाले, "शाहू महाराज यांची विचारसरणी आणि त्यांचं कुटुंब आम्ही चळवळीच्या जवळील मानतो. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा शाहू महाराज यांना पाठिंबा आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते केले.26 तारखेनंतर भूमिका जाहीर करणार -"10 जागांसंदर्भात शिवसेना ठाकरे गटात वाद आहेत. 5 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद आहेत. महाविकास आघाडीत जागांचा तिढा संपत नाही. त्यामुळे त्यांच्या वादात कुठं जायचं. 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. नंतर आमची भूमिका जाहीर करू," असा इशारा आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.