Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! राज्यातील आणखी एका बड्या बँकेत मोठा घोटाळा, ठेवीदारामध्ये भीती

Breaking News! राज्यातील आणखी एका बड्या बँकेत मोठा घोटाळा, ठेवीदारामध्ये भीती 


जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यातील आणखी एका बँकेमध्ये पैशांचा मोठा अपहार झाला आहे. नांदुरा अर्बन बँकेला कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानेच तब्बल पाच कोटी 45 लाख रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. गजानन शर्मा असं या संगणक अधिकाऱ्याचं नाव आहे. त्याने इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ही रक्कम इतर बँकेच्या विविध खात्यात ट्रान्सफर केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली असून, ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरा अर्बन बँकेचा कनिष्ठ संगणक अधिकारी गजानन शर्मा यानं बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्याने इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं बँकेतील तब्बल पाच कोटी 45 लाख रुपयांची रक्कम इतर बँकांच्या विविध खात्यात ट्रान्सफर केली. ही बाब बँकेच्या संचालकांच्या लक्षात येताच शर्मा यांच्याविरोधात नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून शर्मा याला अटक केली आहे.ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण 

दरम्यान ही बातमी समोर आल्यानंतर ठेवीदारांमध्ये भीतीनं वातावरण पसरलं असून, ठेविदारांनी बँकेत गर्दी केली, घडलेल्या प्रकारानंतर यावर बँक व्यवस्थापनाच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कोणीही घाबरून जाऊ नये, ठेवीदारंच्या ठेवी सुरक्षीत असल्याचा दावा बँकेकडून करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.