Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Lawyer आणि Advoacte एक नाही तर वेगवेगळे, 99 टक्के लोकांना माहित नाही ही गोष्ट

Lawyer आणि Advoacte एक नाही तर वेगवेगळे, 99 टक्के लोकांना माहित नाही ही गोष्ट

मुंबई : काळा कोट आणि पांढरा शर्ट पाहिला की लोकांच्या मनात एकच गोष्ट येते. ते म्हणजे ही व्यक्ती वकील असावी. त्यांना अनेक नावांनी ओळखले जाते, कोणी त्यांना लॉयर म्हणतात, तर कोणी ॲडवोकेट देखील म्हणतात, परंतु तुम्हाला माहित आहे की हे सगळेच सारखे नाहीत? बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे. पण आज याबद्दल फरक समजून घेणार आहोत.

Lawyer म्हणजे काय ?

Lawyer आणि ॲडवोकेट दोघांनाही कायद्याचे ज्ञान आहे. Lawyer हा शब्द सर्वसाधारणपणे वापरला जातो. ज्यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी याचा वापर केला जातो. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, Lawyer तो असू शकतो ज्याने एलएलबी म्हणजेच कायद्याचे शिक्षण घेतले आहे. मात्र, कायद्याचे शिक्षण घेतलेली कोणतीही व्यक्ती ॲडवोकेट असेल असं नाही. परंतु कोणत्याही व्यक्तीला कायदेशीर सल्ला देण्याचे काम Lawyer करू शकतो, परंतु तो न्यायालयात कोणत्याही व्यक्तीसाठी खटला लढू शकत नाही.


Advocate कोणाला म्हणायचे?

Advocate बद्दल बोललो तर Advocate ला Lawyer पेक्षा वेगळे म्हणता येईल. हा शब्द अशा लोकांसाठी वापरला जातो जे, कायद्याचा अभ्यास केल्यानंतर, न्यायालयात इतर कोणासाठी तरी लढू शकतात. जसे आपण एखाद्या वकिलाकडे केससाठी जातो आणि तो कोर्टात आपल्या बाजूने युक्तिवाद करतो किंवा केस लढतो, तो एक Advocate असतो. प्रत्येक Lawyer हा Advocate च असेल असे नाही. पण प्रत्येक Advocate हा Lawyer असतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की जर कोणी कायद्याचा अभ्यास करून इतरांसाठी खटला लढत नसेल तर त्याला Lawyer म्हणतात. त्याच वेळी, जर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसाठी खटला लढत असेल तर त्याला Advocate म्हणतात. तो व्यावसायिक आहे. Advocate होण्यासाठी, Lawyer ला बार कौन्सिलमध्ये नोंदणी करावी लागते आणि बारची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते, त्यानंतर तो Advocate होऊ शकतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.