Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

SBI Credit Card वापरकर्त्यासाठी महत्वाची बातमी, कार्डच्या नियमांमध्ये झाले हे बदल

SBI Credit Card वापरकर्त्यासाठी महत्वाची बातमी, कार्डच्या नियमांमध्ये झाले हे बदल


खिशात पैसे नसतील आणि अचानक पैशांची गरज भासली की अनेकजण क्रेडिट कार्ड वापरतात. पैशांची कमतरता असताना एखादी वस्तू ताबडतोब विकत घ्यायची गरज पडल्यास किंवा अचानक पैशांची गरज भासल्यास सर्वात आधी आपण क्रेडिट कार्डचा विचार आपण करतो. अचानक येणाऱ्या खर्चाला तोंड देण्यासाठी क्रेडिट कार्ड खूप फायदेशीर ठरते.

परंतु कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड वापरताना आपण त्या क्रेडिट कार्डचे नियमही लक्षात ठेवले पाहिजेत. आता अलीकडेच भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांक बदल केले आहेत. एसबीआयचे हे नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे तुम्हीही SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला या नियमांची माहिती असणं आवश्यक आहे.


SBI ने क्रेडिट कार्डच्या नियमांत केले हे बदल

किमान रक्कम: 

आता तुमच्या क्रेडिट कार्डवरील किमान रक्कम खालीलप्रमाणे मोजली जाईल - एकूण GST + EMI रक्कम + 100% फीस आणि चार्ज + 5% वित्त शुल्क + किरकोळ खर्च / रोख पैसे काढण्याची रक्कम + ओव्हरलिमिट रक्कम. हा नियम 15 मार्च 2024 पासून लागू होणार आहे.

भाड्यावर रिवॉर्ड: 

पूर्वी तुम्हाला एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरल्यावर रिवॉर्ड पॉइंट मिळायचे पण आता असे होणार नाही. बँकेने आता काही क्रेडिट कार्डसाठी ही सुविधा बंद केली आहे.


सदस्यत्व मिळेल : 

16 ऑगस्ट 2023 पासून एसबीआय बँक AURUM क्रेडिट कार्ड ग्राहकांना क्लब मॅरियटच्या सदस्यत्वासोबतच लाइव्ह मिंट आणि द वॉल स्ट्रीट जर्नलच्या डिजिटल आवृत्त्यांचेही सदस्यत्व मिळेल.

2000 रुपयांचे व्हाउचर: 

बँकेच्या नव्या नियमानुसार सिंपली क्लिक आणि सिंपली क्लिक ॲडव्हांटेज कार्डधारकांना 1 लाख आणि 2 लाख रुपयांच्या ऑनलाइन खर्चावर 2000 रुपयांचे क्लियरट्रिप आणि यात्रा ऑनलाइन व्हाउचर मिळतील. किरायाच्या पेमेंटवर कर: जर तुम्ही 17 मार्च 2023 नंतर तुमच्या SBI क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरले असेल तर तुम्हाला व्यवहारावर लागू होणाऱ्या करांसह 199 रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.