Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

17 वर्षांच्या मुलीला 7 महिन्यात 10 वेळा विकलं

17 वर्षांच्या मुलीला 7 महिन्यात 10 वेळा विकलं

रोहतक : सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. एक अल्पवयीन तरुणी टोळीच्या तावडीतून सुटून पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर सेक्स रॅकेटचा खुलासा झाला आहे. ही तरुणी या टोळीच्या तावडीत सापडली होती. तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात होतं. पोलिसांनी बलात्कार, पॉक्सो, वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणं यासंबंधी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीने एका 17 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीची लग्नासाठी सात महिन्यांत 10 वेळा विक्री केल्याचं समोर आलं आहे. या कालावधीत तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं गेलं. ही तरुणी कशी तरी टोळीच्या तावडीतून सुटून पोलिसांपर्यंत पोहोचली आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. दिल्लीतील शालिमार बाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सध्या पीडित तरुणीचं समुपदेशन सुरू आहे.पीडितेनं सांगितलं की, आरोपी मला जहांगीरपुरी, मुकुंदनगर, शालिमार बाग आणि इतर परिसरातील घरे आणि हॉटेल्समध्ये घेऊन जायचे आणि तिथं बळजबरीने देहविक्री करायला लावायचे. या प्रकरणातील दोन महिला आणि एका पुरुषाचं नावं पीडितेनं पोलिसांना सांगितलं आहे. या तीन व्यक्तींना पीडितेबरोबर पाठवलं जायचं. यानंतर टोळीतील सदस्यांनी पीडितेला लग्न कर, मग तुझी वेश्या व्यवसायातून सुटका होईल, असं सांगून फसवणूक केली. पीडितेनं होकार दिल्यावर ऑगस्टमध्ये टोळीने रोहतकमधील एका व्यक्तीशी तिचं लग्न लावून दिलं. या बदल्यात संबंधितांकडून दोन लाख रुपये देखील घेतले होते.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 21 मार्च रोजी पीडित तरुणीने पोलिसांशी संपर्क करून तक्रार नोंदवली. माझ्या वडिलांचे निधन झाले आहे, असं या पीडितेनं सांगितलं. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तिने विकास (नाव बदललेलं आहे) नावाच्या युवकाशी लग्न केलं. त्यानंतर ती मुकुंदपूरमध्ये राहू लागली. पण विकासने तिची फसवणूक केली. बेरोजगार असलेला विकास जुलै महिन्यात पीडितेसोबत रुबी आंटी नावाच्या महिलेच्या घरी राहू लागला. या दरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली. पण नंतर विकास तिला सोडून निघून गेला.

रुबीचा मुलगा साहिलने पीडित तरुणीवर बलात्कार केला. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. या वेळी रुबीने बलात्काराचा व्हिडिओ शूट केला आणि त्या आधारे ती पीडितेला ब्लॅकमेल करू लागली आणि तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं. पीडितेने यासाठी विरोध केला तर तिला जबर मारहाण केली. विकास तुझी विक्री करून पळून गेल्याचं रुबीनं पीडितेला सांगितलं. 7 मार्चला पीडित तरुणी रुबीच्या घरातून पळून तिच्या आईकडे गेली. त्यानंतर तिच्या आईनं तिला मॉडेल टाउनमधील एका व्यावसायिकाच्या घरी घरकामासाठी ठेवलं. पण या टोळीने पीडितेच्या आईला करण्याची धमकी देत पीडितेची माहिती काढली. आरोपी मॉडेल टाउनमध्ये पोहोचले आणि तिला बळजबरीनं घेऊन जाऊ लागले असता घरमालकाने पोलिसांना या बाबत माहिती दिली. यानंतर सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आणि महिला आयोगासमोर तिचा जबाब नोंदवला. त्यानंतर एफआयआर नोंदवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.