Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तो येत आहे! पायात घुंगरू अन, उधळला गुलाल :, या दिवशी येतोय ' पुष्पा 2' चा टीझर

तो येत आहे! पायात घुंगरू अन, उधळला गुलाल :, या दिवशी येतोय ' पुष्पा 2' चा टीझर 


साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा-द राईज' या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक नवे रेकॉर्ड स्थापित केले आहेत.


या चित्रपटाने लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच वेड लावलं आहे. या चित्रपटाचे डायलॉग्स आणि गाणी सतत लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतात. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची जोडी सुपरहिट ठरली. चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागून आहे. पुष्पा- द राईजच्या अफाट यशानंतर निर्मात्यांनी आता 'पुष्पा- द रुल' ची लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज झालं असून या सिनेमाच्या टीझरच्या रिलीजची तारुखही समोर आली आहे.

चाहते अनेक दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'ची वाट पाहत आहेत. पण आज निर्मात्यांनी चित्रपटाशी संबंधित नवे अपडेट्स शेअर केले आहेत. या चित्रपटाचा टीझरही काही दिवसांतच प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करत टीझरची तारीख जाहीर केली आहे. अल्लू अर्जुनला पुन्हा 'पुष्पा' च्या अवतारात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

काही काळापूर्वी निर्मात्यांनी 'पुष्पा 2' चे नवीन पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये पुष्पा च्या पायात घुंगरू बांधलेले दिसत आहेत. 'पुष्पा २' चा टीझर आता ८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमात अल्लू अर्जुनाचा पुष्पा अवतार पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

अल्लू अर्जुन व्यतिरिक्त 'पुष्पा 2' मध्ये पहिल्या भागातील रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल हे कलाकार देखील दिसणार आहेत. तसेच सुनील आणि साई पल्लवी यांची नावं देखील समोर आली आहेत. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' 15 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक तुफान व्हायरल झाला होता. आता प्रेक्षकांच्या या प्रतिसादामुळेच 'पुष्पा 2' सुपर-डुपर हिट होणार यात काही शंका नाही.

पुष्पाचा पहिला भाग हिट झाल्यानंतर अल्लू अर्जुनने सीक्वेलसाठी दुप्पट फी आकारली आहे. 'पुष्पा : द रूल' साठी अल्लू अर्जुनने थोडी थिडकी नाही तर तब्बल 85 कोटी रुपये आकारले असल्याचं कळतंय. अल्लू अर्जुनने आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आकारत फिल्म इंडस्ट्रीतला एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच आता 'पुष्पा : द रुल' या दुसऱ्या भागात काय रंजक असणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.