Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

" रा. स्व. संघाच्या सर्व्हेनुसार भाजपाला 200 जागाही मिळणे कठीण " बड्या नेत्याने स्पष्टचं सांगितलं

" रा. स्व. संघाच्या सर्व्हेनुसार भाजपाला 200 जागाही मिळणे कठीण " बड्या नेत्याने स्पष्टचं सांगितलं 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेने जे देशांतर्गत सर्वेक्षण केले आहे, त्यात भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत २०० जागाही जिंकू शकणार नाही आणि कर्नाटकात भाजप आठ जागाही पार करू शकणार नाही असा निष्कर्ष निघाला आहे, असा दावा कर्नाटकातील मंत्री व कॉंग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी केला आहे. कर्नाटकातील दुष्काळाच्या बाबतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे "खोटे बोलत" असल्याचा आरोप करून ते महणाले की, दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर करण्यात राज्य सरकारकडून दिरंगाई केल्याचा आरोप शहा करीत आहेत. शहा हे "खोटी माहिती देणारे मंत्री" असायला हवे होते अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

त्यांनी नमूद केले की, आरएसएसचा अंतर्गत सर्व्हे सांगतो की त्यांना (भाजप) २०० जागाही मिळणार नाहीत. आरएसएस म्हणतोय कर्नाटक राज्यात आठ जागाही भाजप पार करू शकत नाही. चौदा-पंधरा जागांवर भाजपचीच अंतर्गत लढाई सुरू आहे, मग ते कर्नाटकात कसे यशस्वी होणार असा दावाही खर्गे यांनी केला.येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते पक्षाला स्वच्छ करण्याची गरज असल्याबद्दल बोलत आहेत.भाजपचे काही नेते म्हणतात की भाजप कर्नाटकातील एका कुटुंबामुळे प्रदूषित झाला आहे. ते म्हणतात की त्यांना मूळ भाजप पुन्हा स्थापित करायचा आहे. बसनगौडा पाटील यत्नाल, सी टी रवी, अनंतकुमार हेगडे, ईश्वरप्पा यांसारख्या भाजपमधील हिंदुत्ववादी नेत्यांवर अन्याय होत असल्याचा दावाही भाजपचेच काही लोक करीत आहेत. त्यांच्यातील हा वाद कॉंग्रेसने निर्माण केलेला नाही असे ते म्हणाले. 

कर्नाटकातील दुष्काळाबाबत राज्य सरकारने विलंबाने अहवाल दिल्याचा जो आरोप अमित शहा यांनी केला आहे त्यावर बोलताना प्रियांक म्हणाले की, मुख्यमंत्र्यांची दुष्काळाबाबत पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याशी झालेली बैठक खोटी होती का? आंतर-मंत्रालयीय केंद्रीय पथक येथे येऊन सर्वेक्षण करून अहवाल सादर करत आहे ते खोटे आहे का? त्यानंतर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने बैठक घेऊन कर्नाटकच्या दुष्काळ व्यवस्थापनाच्या प्रयत्नांची लेखी प्रशंसा करणे, हे खोटे आहे काय? अमित शहा इतके खोटे का बोलत आहेत? असा सवाल त्यांनी केला.  

मंगळवारी बेंगळुरूमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संबोधित करताना, शाह म्हणाले होते की कर्नाटकात दुष्काळ आहे आणि राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यास तीन महिने उशीर केला आणि आज केंद्राकडे दुष्काळ निवारणासाठी अर्ज पाठवला आहे. ते आता यावर राजकारण करीत आहे असा दावा अमित शहा यांनी केला होता. त्यावर प्रियांक यांनी हा हल्लाबोल केला. ते म्हणाले की कर्नाटकच्या दुष्काळाबाबत आम्ही गेल्या वर्षी २३ सप्टेंबरलाच अहवाल दिला आहे. असे असताना ते इतके खोटे कसे बोलू शकतात असा सवाल त्यांनी केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.