Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आदित्य ठाकरेंच्या सभेत कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हणाला 200 रुपये घ्या, पण...,

आदित्य ठाकरेंच्या सभेत कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हणाला 200 रुपये घ्या, पण...,

शिर्डी : राज्यात एकीकडे उन्हाचा पारा वाढला आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरत आहे. पण या प्रचार सभांमध्ये उन्हामुळे कार्यकर्ते आणि नागरिक पुरते बेजार झाले आहे. शिर्डीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार सभेमध्ये एका नागरिकाने 200 रुपयांची नोट देतो पण पाणी तरी द्या, अशी मागणीच केली.

आज शिर्डीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत वाकचौरेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत राहाता शहरात सभा पार पडली. यावेळी नेत्यांची एकीकडे भाषण सुरू होत तर दुसरीकडे प्रचाराला हजर असलेल्या नागरिक आणि कार्यकर्ते उन्हामुळे पुरते बेजार झाले.

पाणी कुठे मिळतं का अशी विचारणा करत होते. पण सभा सुरू असल्यामुळे गर्दीतून कुणाला उठून जाता येत नव्हतं. सभेदरम्यान उन्हाने तहानलेल्या कार्यकर्त्याने मान्यवरांचे भाषण सुरू असतानाच '200 रुपये घ्या, पण पाणी द्या' अशी मागणी केल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. आता कार्यकर्ताच संतापला असल्यामुळे लगेच पाण्याची बाटली आणून देण्यात आली पण त्याच्याकडून 200 रुपये घेतले नाही. त्यामुळे उन्हात सभा घेतांना राजकीय नेते आणि उमेदवारांनी कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

पाण्यासाठी गाडीवर तुटून पडले कार्यकर्ते!

दरम्यान, सांगलीमध्येही भाजपच्या प्रचारसभेत अशीच घटना घडली होती. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारानिमित्त शहरांमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी सांगलीमध्ये पाण्यासाठी कार्यकर्त्यांची धावाधाव दिसून आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्त येणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासाठी भाजपकडून पाण्याची सोय करण्यात आली होती. पण पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी अक्षरशः कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. उन्हाचा कडाका असल्याने पाण्यासाठी कार्यकर्ते पाणी वाटणाऱ्या गाडीवर तुटून पडले होते. अक्षरश: काही वयस्कर आणि तरुण चालत्या गाडीला लोंबकळत होते. त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती. तर सभा संपल्यानंतर या ठिकाणी रस्त्यावर अक्षरशः प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.