Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

2024 ची लोकसभा लढविण्यासाठी 52 एकर जमीन, करोडोची प्रॉपर्टी विकणारे शिवाजीराव जाधव कोण?

2024 ची लोकसभा लढविण्यासाठी 52 एकर जमीन, करोडोची प्रॉपर्टी विकणारे शिवाजीराव जाधव कोण?


राजकारणात पैसा आहे, अस म्हणतात. म्हणूनच दर पाच वर्षांनी काही राजकीय नेत्यांची संपत्ती आपल्याला दुप्पट झालेली दिसते. पण या देशात असे सुद्धा काही नेते आहेत, जे पदरची संपत्ती विकून निवडणूक लढवतात. राजकारण, समाजकरणात पद, प्रतिष्ठा या महत्त्वकांक्षेतून निवडणूक लढवली जाते. पण विजय मिळाला नाही, तर तो उमेदवार कर्जबाजारी होतो, मोठ आर्थिक नुकसान होतं. 

याची सुद्धा अनेक उदहारण आपण पाहिली आहेत. अगदी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीतही विजय मिळवण्यासाठी काही उमेदवार वाट्टेल तेवढा पैसा खर्च करतात. त्यातून अनेक पदरी निराशाच येते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते ही अपक्ष म्हणून हिम्मत लागते. कारण लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो. लोकसभेला अपक्ष उमेदवाराच्या विजयाची शक्यता तशी कमीच असते. पण इच्छेला पर्याय नसतो.

आता हिगोंलीतून भाजपाचे शिवाजीराव जाधव निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. राजकारणासाठी त्यांनी आतापर्यंत 52 एकर जमीन, करोडोंची प्रॉपर्टी विकली आहे. एडवोकेट शिवाजीराव जाधव यांची गिरीश महाजन यांनी भेट घेतली. त्यानतंरही ते निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. शिवाजीराव जाधव हिंगोली भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. निवडणूक हरलो, तर पुन्हा दिल्लीत जाऊन वकिली करेन असं जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीमध्ये हिंगोलीचा जागा शिवसेनेकडे गेली आहे. हिंगोलीमधून बाबूराव कदम महायुतीचे उमेदवार आहेत.

कुठली, किती संपत्ती विकली?

शिवाजीराव जाधव म्हणाले की, “मागच्या 10-12 वर्षांपासून मी हिंगोली विधानसभा, वसमत विधानसभा परिसरात काम करतोय. 80 टक्के समाजकरण आणि 20 टक्के राजकारण या सूत्राने काम केलय. दिल्लीतली मोठी प्रॅक्टिस सोडून सोडून इथे आलो” “2014 ला पहिली निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्र सादर केलं. 2024 ला पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर केलं, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की वसमंतची प्रॉपर्टी विकली, 50 एकर बागायती जमीन विकली. नांदेड, पुणे, नोएडा, दिल्ली येथील करोडो रुपयांची संपत्ती विकली. माझ्या नावावर आता फक्त वडिलोपार्जित 66 गुंठे जमीन आहे. मला सीएम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे” असं शिवाजीराव जाधव म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.