Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

3 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

3 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार


गोंदिया : तालुक्यातील इर्री, मोरवाही व नवरगाव कला येथे मागील काही दिवसांपासून अवेळी वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार वाढला आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही उपाययोजना होत नाही. त्यामुळे नियमीत व सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. Boycott of Election 2024 तालुक्यातील इर्री, मोरवाही व नवरगाव कला येथे कोणतीही पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिकांसह विविध कामकाजांचा खोळंबा नित्याची बाब झाली आहे. त्यातच मागील काही दिवसापासून यात वाढ झाली आहे. Boycott of Election 2024 तीनही गावात चोवीस तासातून अर्धाअधिक वेळ वीजपुरवठा बंदच राहतो.


नियमीत वीजपुरवठा होत नसल्याने या गावांतील शेतकर्‍यांनी लावलेले रब्बी धान वाळत चालले आहे. सध्या उन्हाळ्याचे दिसत असून रात्रीबेरात्री वीजपुरवठा बंद होत असल्याने लहान मुलांचे व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे. Boycott of Election 2024 वीजपुरवठा नियमीत व सुरळीत करण्यासंदर्भात नागरिकांनी अनेकदा विद्युत वितरण कंपनीला निवेदन दिले. 

मागील महिन्यात झिलमिली येथील कनिष्ठ कार्यालयावर धडक मोर्चाही काढला. तेव्हा लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर समस्या मार्गी लावण्याचे आश्‍वासन मिळाले. मात्र महिना लोटूनही समस्या मार्गी लागली नाही. Boycott of Election 2024 त्यामुळे या गावांतील वीज समस्या तातडीने मार्गी लावावी, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. तसे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले असून जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.