Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कंस शक्य आहे? 8 वेळा मृत्यू होऊनही पुन्हा जींवत :, चमत्कार पाहून डॉक्टरही आवाक

कंस शक्य आहे? 8 वेळा मृत्यू होऊनही पुन्हा जींवत :, चमत्कार पाहून डॉक्टरही आवाक 


नवी दिल्ली : आपण खूप जगावं असं कुणाला वाटत नाही. पौराणिक कथेत अमरात्वचं वरदान मिळवण्यासाठी काही जणांनी किती कठोर तप केलेत हे तुम्ही पाहिलं असेल, काहींनी अमरत्वाचं वरदान  मिळाल्याचं या कथेत सांगितलं जातं. पण हे झालं कथेत, तुम्हाला विश्वास बसणार नाही प्रत्यक्षातही अशी एक व्यक्ती जिला अमरत्वाचं वरदान मिळालं असंच म्हणावं लागेल. कारण ही व्यक्ती आठ वेळा मृत होऊन पुन्हा जिवंत झाली आहे.


पृथ्वीवर जन्म घेतो त्याचा मृत्यू अटळ आहे. काही लोकांचं कमी वयातच मृत्यू होतो, काही लोक खूप वर्षे जगतात. पण काही लोक आपण मृत्यूच्या दारातून परत आल्याचा दावा करतात. अशीच एक व्यक्ती जी अमेरिकेत राहते. ती तब्बल 8 वेळा मृत होऊन जिवंत झाल्याचं सांगितलं जातं.

इव्हान हॉयट वासरस्ट्रॉम असं या व्यक्तीचं नाव आहे. न्यू जर्सीत राहणाऱ्या इव्हानला लोक व्हॉल्व्हरिन म्हणू लागले आहेत. तुम्ही व्हॉल्वरीन फिल्म पाहिली असेल तर त्यात अभिनेता ह्यु जॅकमनकडे असलेल्या अनोख्या शक्तीमुळे तो कधीच मरत नाही, असं दाखवलं आहे. त्यामुळे मृत्यूनंतर जिवंत होणाऱ्या इव्हानची तुलना आता व्हॉल्वहरिनशी केली जात आहे.

इव्हानसोबत काय घडलं?

इव्हान सांगतो की, जेव्हा तो 40 वर्षांचा होता, तेव्हा एके दिवशी त्याच्या डाव्या हातात जळजळ जाणवू लागली. त्यानंतर त्याने स्वतः 911 वर कॉल केला. मात्र, याच दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला. जेव्हा रुग्णवाहिका आली तेव्हा इव्हानला चालताच येत नव्हतं. तो श्वास घेत नव्हता. पॅरामेडिक्सच्या टीमने त्याच्यावर रुग्णवाहिकेत उपचार केले. त्यानंतर त्याने श्वास घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पुन्हा त्याचा श्वासोच्छवास थांबला आणि एकूण पाच वेळा तो रुग्णवाहिकेतच मृत होऊन पुन्हा जिवंत झाला.

त्यानंतर जेव्हा रुग्णवाहिका इव्हानला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचली. शस्त्रक्रियेपूर्वीही त्याचा श्वास दोनदा थांबला. पूर्ण दोन मिनिटे तो श्वास घेतच नव्हता. नंतर तो पाच दिवस कोमात गेला आणि त्याला ईसीएमओ मशीनवर ठेवण्यात आले, ज्यामुळे त्याच्या हृदयाचे ठोके कमी झाले. त्यानंतर जेव्हा त्याचा श्वासोच्छ्वास नीट काम करू लागला तेव्हा ईसीएमओ मशीन काढून टाकण्यात आले, पण तो फार काळ जगू शकेल असं डॉक्टरांना वाटलं नाही.

डॉक्टरांचाही विश्वास बसेना

प्रत्येक वेळी 30-40 सेकंदांसाठी तो मृत अवस्थेत गेला हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. रिपोर्ट्सनुसार, डॉक्टरांचा असा विश्वास होता की इव्हान जरी जिवंत राहिला तरी त्याला चालायला आणि बोलायला किमान दोन वर्षे लागतील, असं डॉक्टरांना वाटलं. पण नंतर असा चमत्कार घडला की डॉक्टरांचाही यावर विश्वास बसेना. इव्हान अवघ्या दीड दिवसात पूर्णपणे बरा झाला, चालू लागला, बोलू लागला. मात्र त्याला 3 दिवस हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि नंतर डिस्चार्ज देण्यात आला. आता तो पूर्णपणे बरा आहे, असं वृत्त LadBible नं दिलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.