Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत बिश्नोई गँगची भाईजानला धमकी

गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत बिश्नोई गँगची भाईजानला धमकी


मुंबई :  बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर येत आहे. सुरुवातीला केवळ हवेत गोळीबार झाल्याची चर्चा होती, मात्र तपासानंतर सलमानच्या घराला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

सलमानच्या घराच्या बाहेरील भिंतीवर गोळ्यांच्या खुणा आढळल्या. यासोबतच सलमानच्या बाल्कनीवरही गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. या बाल्कनीतून सलमानने त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. सलमान खान अनेकदा त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत दिसतो. या बाल्कनीवरही गोळीबार झाला आहे.

फॉरेन्सिक टीमला बाल्कनीत गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपीने चेहरा झाकलेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मुंबई पोलिसांना एक सीसीटीव्ही सापडला आहे, मात्र चित्र अस्पष्ट आहे. पोलीस आता परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज पाहत आहेत.

दरम्यान, अश्यातच या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली बिश्नोई गॅगने स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचं मान्य केलं आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या गँगने याबद्दल खुलासा केला आहे.

अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी याची सत्यता पडताळून पाहत आहेत.

अनमोल बिश्नोई !

ओम. जय श्री राम. जय गुरु भवेश्वर, जय गुरु दयानंद सरस्वती. जय भारत. आम्हाला शांतता हवी आहे, दडपशाहीविरोधात निर्णय युद्धातून घेतला जात असेल तर युद्ध योग्य आहे. सलमान खान आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केलं आहे.

तुला आमची ताकद समजावी यासाठी हे केलं आहे. तुला ही शेवटचा इशारा आहे. यानंतर रिकाम्या घरावर गोळ्या झाडणार नाहीत. ज्या दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलला तू देव मानल आहेस. त्यांच्या नावाने आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. बाकी मला बोलायची सवय नाही.

जय श्री राम जय भारत सलाम शाहिदा (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) गोल्डी ब्रार रोहित गोदरा कला जठारी...!!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.