Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' भाजप जिकूं दे, तुला घरातून उचलून आणेन ', कार्यकर्त्याची महिलेला धमकी :, पोलीसानी केली अटक

' भाजप जिकूं दे, तुला घरातून उचलून आणेन ', कार्यकर्त्याची महिलेला धमकी :, पोलीसानी केली अटक 


पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न होत आहे. तर तृणमूल काँग्रेसकडूनही भाजपाला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. संदेशखाली प्रकरणानंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या विरोधात आघाडी उघडली होती.


तृणमूलचा नेता कसा महिलांवर अत्याचार करत होता, हे सांगितले गेले. त्यानंतर आता तृमणूलकडूनही भाजपाचे लोक महिलाविरोधी कसे आहेत? हे दाखिवण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी राज्यात घडणाऱ्या घटनांना थेट हात घातला जातो. एका आदिवासी महिलेला घरातून फरफटत बाहेर आणून अपहरणाची धमकी दिल्याबद्दल एका भाजपा कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर तृणमूलने भाजपावर निशाणा साधला.

अटक झालेल्या भाजपा कार्यकर्त्याचे नाव शिव शंकर दास असे आहे. त्याने एका आदिवासी महिलेला धमकी देताना म्हटले की, जर राज्यात भाजपाचा विजय झाला, तर तुला घरातून उचलून आणेन. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी महिला तिच्या दोन मुलांसह घरात होती. तेव्हा आरोपी दास तिथे आला आणि त्याने तिच्या गळ्यावर धारधार शस्त्र ठेवून तिला बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले, त्यानंतर दासने तिथून धूम ठोकली.

मात्र पळून जाण्याआधी आरोपी दास याने सदर महिलेला धमकी दिली. राज्यात भाजपाचा विजय झाल्यानंतर तुला घरातून उचलून आणेन, अशी धमकी दिल्याचा उल्लेख महिलेने आपल्या तक्रारीत केला. जांगीपारा पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

तृणमूल काँग्रेसने या प्रकरणावरून भाजपावर निशाणा साधला. भाजपा पक्ष हा महिलाविरोधी असल्याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. भाजपाची विचारधारा महिला विरोधी आणि आदिवासी विरोधी आहे, असाही आरोप तृणमूलने केला. स्थानिक तृणमूलचे नेते तमल सोभन चंद्रा यांनी या घटनेचा संबंध संदेशखाली हिंसाचाराशी जोडला. ते म्हणाले, भाजपाने संदेशखाली बद्दल अपप्रचार केला. पण त्यांच्या पक्षाचेच कार्यकर्ते महिलांशी कसे वागतात? हे या प्रकरणावरून दिसत आहे. रात्रीच्या अंधारात महिलेच्या घरात घुसून ते महिलांना उचलण्याची भाषा बोलत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.