Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उन्हाळयात अल्कोहोलचे सेवन चांगले का वाईट ? ब्रँड निवडताना चूक झाली तर..

उन्हाळयात अल्कोहोलचे सेवन चांगले का वाईट ? ब्रँड निवडताना चूक झाली तर..


उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला हवी, हे काही नव्याने सांगायला नको. कारण, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डीहायड्रेशनची समस्या सर्वाधिक होते. यामधून ब्रेन स्ट्रोक आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. मात्र, अनेक लोक एकवेळ पाणी कमी पीतील पण अल्कोहोलचे सेवन सोडणार नाहीत. अशा लोकांचं ऋतूंशी काहीही घेण देणं असतं. ज्या दिवशी मन केलं त्या दिवशी बाटली फोडली असा यांचा नियम. पण काही लोक बियर, वाईन, रम का विस्की?? यामध्ये कायम कन्फ्युज असतात. अशा लोकांना बदलत्या हवामानानुसार काय पिणे चांगले आणि काय पिणे वाईट? याबात जाणून घेण्यात अधिक रस असतो. अशा लोकांसाठी आजची ही बातमी असे समजा.



कोणत्याही बाजूने विचार केला तरीही अल्कोहोल शरीरासाठी हे वाईटच असतं. पण बरेच लोक एक मजा म्हणून अशा पेयाचे सेवन करतात. यामध्ये बियर, वाईन, रम, व्हिस्की असे अनेक प्रकार असतात. उन्हाळ्याच्या दिवसात यांपैकी नेमका कोणता ब्रँड निवडावा? याबाबत कन्फ्युजन होत असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी कुठे ना कुठे फायद्याची ठरू शकते. चला तर उन्हाळ्यात काय प्यावे आणि काय पिऊ नये? याविषयी जाणून घेऊयात

बियर हे स्वभावाने अत्यंत लाईट ड्रिंक आहे. यामध्ये अल्कोहोलचे प्रमाणदेखील फार कमी असते. बिअरच्या बाटलीवर तसे नमूद केलेले असते. अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी बरेच लोक बियरचे सेवन करतात. यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, बियरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असले तरी कॅलरीचे प्रमाण मात्र फार जास्त असते. त्यामुळे बियरचे अधिक सेवन केल्यास तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.

जर तुम्ही स्ट्रॉंग अल्कोहोलच्या शोधात असाल तर विस्की हा त्याबाबतीत एक उत्तम पर्याय आहे. कारण, व्हिस्कीमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. मात्र व्हिस्कीचे सेवन करताना त्याचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा व्हिस्की आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करतेवेळी ड्रिंक टेस्टचा विचार करत असाल किंवा ड्रिंक टेस्टला प्राधान्य देत असाल तर यासाठी वाईन एक चांगला पर्याय असू शकतो. मात्र लक्षात घ्या, वाईनमध्ये बियरपेक्षा अधिक अल्कोहोल असते. त्यामुळे वाईनचे सेवन करणे देखील काही प्रमाणातच बरे म्हणता येईल.

रम हे स्वभावाने उष्ण पेय आहे. त्यामुळे गर्मीच्या दिवसात रमचे सेवन घातक ठरू शकते. खास करून रमचे सेवन हे थंड हवेच्या ठिकाणी किंवा थंडीच्या मोसमात केले जाते. कारण रममध्ये असलेले उसण घटक शरीराला उब देण्याचे काम करतात असे सांगितले जाते. मात्र याबाबत कुठेही ठोस पुरावा नाही. 

विशेष असे की. रम उष्ण असूनही वेस्टइंडीज सारख्या उष्ण तापमानाच्या देशात नियमित स्वरूपात प्यायली जाते. अशा उष्ण ठिकाणी रमचे सर्वाधिक सेवन होत असूनही त्यांना त्रास होत नसेल तर साहजिक आहे गर्मीच्या दिवसातही रमी प्यायला हरकत नाही. केवळ त्याचे प्रमाण अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी.

असे असले तरीही अल्कोहोल शरीराचे नुकसान करते. त्यामुळे गरमी असो वा थंडी, अल्कोहोलचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. तरीही जर तुम्ही अल्कोहोलचे सेवन करत असाल तर त्याचे प्रमाण कमी असेल याची काळजी घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.