Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं

शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं


पुणे :  सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन अजित पवार गटाने कुठल्याही वृत्तपत्रातून केलेले नाही. उलट निवडणुक प्रचार सुरू झाल्यावर न्यायालयाच्या आदेशातील शेवटची ओळ वगळण्याची मागणी करणारा अर्ज दाखल करून अजित पवार गटाने आदेशाची थट्टा उडवली आहे.


अशी तक्रार शरद पवार गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली. त्यावर सुनावणी घेत अजित पवार गटाला कोर्टाने चांगलेच फटाकारलं आहे. यावरून आता शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केलीय.

घड्याळ चिन्हाविषयी दिलेल्या अंतरिम आदेशाची पायमल्ली करण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल, असे कोर्टाने म्हणत अजित पवार गटाला चांगलेच फटाकरलं. त्यावर घड्याळ चिन्हाचा वाद न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल. असा स्पष्ट उल्लेख प्रचार साहित्यात करण्याचा सज्जड दम अजितदादा मित्र मंडळाला दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार रोहित पवारांनी मानले आहे. यातच आता अजितदादा मित्र मंडळाने आता नवीन टेंग लाईन वापरावी. असे म्हणत घड्याळ तात्पुरतं अन् वेळ वाईट असे म्हणत रोहित पवारांनी अजितदादा गटाला डिवचलं आहे.

दरम्यान, १९ मार्चच्या आदेशानंतर अजित पवार गटाने आतापर्यंत किती जाहिराती प्रसिद्ध केल्या आणि त्यातील मजकुर काय होता याचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायालयने दिले. त्यावर अजित पवार गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांना न्यायालयाला काही जाहिराती दाखवल्या. न्यायालयाच्या आदेशातील शेवटच्या ओळीत बदल करण्याविषयीचा अर्ज भविष्यासाठी केला आहे असे रोहगती यांनी सांगितले. मात्र निवडणुक संपेपर्यंत आदेशाचे पालन करावेच लागेल. असे नुमद करून या प्रकरणी पुढील सुनावणी लवकरात लवकर करण्यात येईल असे न्यायालयाने सांगितले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.