KCRतेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या घराबाहेर तांत्रिक विधी झाल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काल हैदराबादमधील बंजारा हिल्सच्या नंदी नगर भागात के चंद्रशेखर राव यांच्या घराबाहेर लोकांचा जमाव जमला होता. त्यांच्या घराजवळील रिकाम्या प्लॉटमध्ये कोणीतरी तंत्रक्रिया केल्याने लोकांमध्ये भीती पसरली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी लोकांना लिंबू, कुंकू, हळद, बाहुल्या आणि इतर वस्तू प्लॉटमध्ये विखुरलेल्या दिसल्या. या सर्व वस्तू तांत्रिक विधींमध्ये वापरल्या जाजात. यानंतर केसीआर यांच्या घराबाहेर जादूटोणा होत असल्याची बातमी परिसरात वणव्यासारखी पसरली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्लॉटमध्ये विखुरलेल्या वस्तू गोळा करून वातावरण निवळले.
जादूटोणा झाल्याची अद्याप पुष्टी झाली नसली तरी, पोलिस प्लॉटमध्ये सापडलेल्या वस्तूंचा तपास करत आहेत. रिकाम्या प्लॉटमध्ये कोणीतरी तंत्रक्रिया करून वस्तू तेथेच टाकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर जादूटोण्यावर विश्वास ठेवण्याचा आणि ते केल्याचा आरोप आहे.2022 साली तेलंगणामध्ये भाजपचे अध्यक्ष असलेले संजय यांनी आरोप केला होता की, चंदशेखर राव यांना जादूची शक्ती मिळवायची होती. त्यांनी आपल्या फार्म हाऊसमध्ये काळी मांजर पाळली आहे. त्यांच्या माहितीदारांनी आपल्याला ही माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही के चंद्रशेखर राव यांच्यावर आरोप केले आहेत.
निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, केसीआर ज्योतिष, अंकशास्त्र आणि तांत्रिक कार्यांवर विश्वास ठेवतात. ते इतके अंधश्रद्धाळू आहेत की ते कधीच राज्य सचिवालयात पाऊल ठेवत नाहीत. ते महिलांना त्यांच्या मंत्रिमंडळात घेत नाहीत. तांत्रिकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी पक्षाचे नाव बदलले होते. त्यांच्या पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) होते, परंतु आता पक्षाचे नाव भारतीय राष्ट्र समिती (BRS) आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.