सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात उद्या ड्राय डे
कोल्हापूर :
घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवार दि. १४ एप्रिल रोजी साजरी केली जात आहे. जयंतीसह लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात उद्या रविवारी दिवसभर ड्राय डे पाळण्याचे आदेश दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लोकसभा निवडणूक, रमजान ईद तसेच डॉ. आंबेडकर जयंती याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी दि. १४ एप्रिल रोजी ड्राय डे जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रविवारी दिवसभर जिल्ह्यात ड्राय डे पाळण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी दिवसभर संपूर्ण जिल्ह्यात ड्राय डे पाळण्याचे आदेश दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.