Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेवर बलात्कार करणाऱ्या महापालिकेच्या दोन कामगारांना अटक

महिलेवर बलात्कार करणाऱ्या महापालिकेच्या दोन कामगारांना अटक 


सांगली :  महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या महापालिकेच्याच दोन कामगारांना अटक करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात हा प्रकार घडला होता. विश्रामबाग पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे.  

वैभव मुरलीधर कांबळे (वय ४०, रा. आंबेडकरनगर, सांगली), निखील नामदेव कोठावळे (वय ३२, रा. रमामातानगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने दि. ५ मार्च रोजी तक्रार दिली होती. पीडित महिला सफाई कामगार म्हणून काम करते. दि. १ जानेवारी रोजी सकाळी ती महिला सफाईचे साहित्य आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी वैभव कांबळे तिच्या पाठीमागे गेला. तिला जबरदस्तीने साहित्य ठेवलेल्या खोलीत नेऊन ठार मारण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कार केला.  

ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनी निखील कोठावळे हाही पीडित महिलेचा पाठलाग करून त्याच खोलीत जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच याबाबत कोठेही वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने मार्चमध्ये त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यातील दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. विश्रामबागचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे, उपनिरीक्षक सुजाता भोपळे, मारूती साळुंखे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, संदीप घस्ते, संकेत कानडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.