Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हातकणंगलेत मत विभाजन अटळ, चौरंगी लढतीत महायुतीला बळ

हातकणंगलेत मत विभाजन अटळ, चौरंगी लढतीत महायुतीला बळ


राज्यात महाविकास आघाडीबरोबर वंचितची फिस्कटलेली घडी आणि स्वाभिमानीने घेतलेल्या स्वतंत्र राहणाऱ्या ठाम भूमिकेमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत जवळपास निश्चित झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत न जाता बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार देण्यावर जवळपास निश्चित केले आहे.दोनच दिवसांत माजी आमदारांपैकी एका उमेदवाराच्या नावावर दोनच दिवसांत माजी आमदारांपैकी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडून वंचित बहुजन आघाडीने  देखील उमेदवार जाहीर केल्याने या मतदारसंघात मत विभाजनाचा फटका पुन्हा एकदा राजू शेट्टी यांना बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने  यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने कंबर कसली आहे. त्यातच स्वाभिमानीला सोबत घेऊन माने यांना पराभवाचा धक्का देण्याचे प्रयत्न ठाकरे गटाचे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीने बिनशर्थ

पाठिंबा द्यावा, या भूमिकेत शेट्टी आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी शेट्टी यांच्यासमोर मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे स्वाभिमानी आणि शिवसेनेतील चर्चा थांबली असून, ठाकरे गट हातकणंगलेत उमेदवार देण्यावर निश्चित झाले आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांचे काका जयसिंह मोहिते पाटील यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाच करून टाकली आहे. त्यामुळे माढ्यातून धैर्यशील यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. खुद्द भाजपचे उमेदवार निंबाळकर यांनीही उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मोहिते पाटील यांना वगळून प्रचाराला सुरुवात केली आहे. मोहिते पाटील विरोधकांना एकत्र करून त्यांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून मोहिते पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात त्यांनाही यश येताना दिसत नाही. त्यामुळे भाजपकडूनही मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, ही शक्यता गृहीत धरूनच आता रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार बैठका घेण्यात येत आहेत.

महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत बराच खल झाला आहे. शरद पवारांनी माढ्यातून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली. जानकर यांनीही तसे संकेत दिले होते. मात्र, अचानकपणे त्यांनी यू टर्न आपण महायुतीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवारही अजून जाहीर झालेला नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. अथवा सांगोल्याचे शेकापचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख  यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. शरद पवार माढ्यात कोणता डाव टाकतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.