Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एरंडोल येथे झाडाला गळफास घेऊन संपवली जीवनाची यात्रा

एरंडोल येथे झाडाला गळफास घेऊन संपवली जीवनाची यात्रा 


एरंडोल यथेपद्मालय फाट्याच्या तीनशे फुट अंतरावर २४ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास 28 वर्षीय युवकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीने फाशी घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. अक्षय भिका महाजन असे मयात तरुणाचे नाव आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अक्षय भिका महाजन हा मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत होता, अक्षय हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. व अक्षयचे वडील एका उपहारगृहात काम करतात, दरम्यान या घटनेची बातमी कळताच अक्षयच्या परिवाराने एकच हंबरडा फोडला. घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यात मुलाने उचललेले टोकाचे पाऊल हे मन हेलावणारे आहे. अक्षय ने जाण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन केल्याचे सांगण्यात आले.

दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. सदर घटने बाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील हे करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.