सांगली : लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा तोंडावर आला असतानाही महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच अजूनही सुटलेला नाही. सांगली जागेचा वाद चालू असतानाच आता भिवंडीच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी कॉंग्रेसने शरद पवार गटाला चांगलाच इशारा दिला.
सांगलीच्या जागेवरून २५ दिवसांपूर्वी उद्धवसेना, काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद मिटला नाही. तोच भिवंडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटविरुद्ध काँग्रेस वाद भडकला आहे. हायकमांडने सांगितले तरी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. पैसेवाल्यांना उमेदवारी दिली आम्ही काय फक्त कामं करायची का, असा सवाल करत काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले की, फारच ताणले गेले तर आम्ही राजीनामा देऊ.
भिवंडी मतदारसंघ हा कॉंग्रेस ठणकावून सांगितलं आहे. जर ही जागा मिळाली नाही तर कॉंग्रेसचे सगळे नेते राजीनामा देतील. याची सुरूवात भिवंडीपासून होईल. असे महेंद्र थोरवे यांनी सांगितलं आहे. तर दयानंद चोरघेंनी अर्ज भरावा, असा ठराव देखील यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे याठिकाणी आता पुढील काही दिवसात काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.दरम्यान, भिवंडीत लोकसभेतून महायुतीकडून कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातील बाळ्या मामा म्हात्रे यांना संधी देण्यात आलीय. मात्र या जागेसाठी कॉंग्रेस आग्रही असून त्यांनी आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला सांगलीत देखील हेच चित्र असून कॉंग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी तर थेट इशाराच दिलाय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.